चिकणी येथे संत भागवत बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
संगमनेर प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे पाईक संतश्रेष्ठ परमपूज्य भागवत बाबा काय यांच्या 45 सभा पुण्यतिथी निमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील अखंड हरिनाम सप्ताहाचे मोठ्या उत्साहात आयोजन केलेले आहे
या निमित्ताने काकडा ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ प्रवचन कीर्तन अशा विविध अध्यात्मिक उपक्रमांसह हा नाम यज्ञ चिकणी येथे सुरू आहे
या अखंड हरिनाम सप्ताहस्य मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी या सप्ताहाचे संपूर्ण आयोजन गावातील तरुण मंडळाने एकत्रित येत अधिकच वैशिष्ट्यपूर्ण केलेले आहे संपूर्ण गावात विद्युत रोषणाई त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार प्रवचनकार यांचे प्रबोधन पर कार्यक्रम या सप्ताहाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
शनिवार दिनांक ४/१०/२०२५ शनिवार दिनांक ११/१०/२०२५ पर्यंत केलेले आहे या कालावधीत गायनाचार्य राजेंद्र महाराज सदगीर सुनील महाराज झांबरे
ज्ञानेश्वर महाराज करंजेकर कविराज महाराज झावरे महादेव महाराज राऊत गायनाचार्य निलेश महाराज कोरडे
अरुण महाराज गिरी यांसह वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार ह. भ.प. द्वाराचार्य महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहितकर यांचे नामवंत कीर्तन तसेच बाळासाहेब महाराज रांजळे यांचे काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे. पुण्यतिथीच्या दिवशी भव्य दिंडी प्रदक्षिणा हे या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे या सप्ताहामध्ये साधारणतः दहा ते बारा हजार भाविक सहभागी होऊन संपूर्ण पंचक्रोशीत हरिनामाचा एक आगळावेगळा गजर या कालावधीत गुंजणार आहे चिकणी गावाला प्रति पंढरीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे अतिशय उत्कृष्ट नियोजनाबद्दल चिकणी येथील समस्त तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.