निधन वार्ता : डॉ.शिवाजी बंगाळ यांचे निधन




निधन वार्ता :  डॉ.शिवाजी बंगाळ यांचे निधन


   अकोले (प्रतिनिधी)अकोले तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातले पहिले एम्. बी. बी. एस्. डॉ.शिवाजी गणपत  बंगाळ (रा.मेहेंदुरी, हल्ली अकोले) यांचे  आज शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ८८ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,भाऊ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. इंजिनिअर दौलत बंगाळ व नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाचे डॉ राजेंद्र बंगाळ यांचे ते वडील तर डॉ. बी. जी. बंगाळ यांचे ते बंधू होत. त्यांच्यावर मेहेंदूरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

   डॉक्टरांनी अकोले येथे १९६६ साली खाजगी मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली होती . तत्पूर्वी अहमदनगर आणि शिरुरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी १९६४ ला इंटर्नशिप केली . पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली होती . 

   अकोले सारख्या दुर्गम आदिवासी ग्रामीण भागातील तालुक्याच्या गावी त्या काळात एम् . बी. बी. एस् . झालेले १९६३ च्या बॅचचे डॉक्टर सेवा देण्यासाठी दाखल होतात ही बाब जेवढी भूषणावह तितकीच विलक्षण आणि प्रत्ययकारी ! त्यांचे थोरले बंधू डॉ. बी. जी. बंगाळ आणि एस्. जी. हे दोन्ही भाऊ तालुक्याच्या गांवी वैद्यकीय क्षेत्रात दीर्घ काळ सचोटीने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने रुग्णांना सेवा दिली.प्रवरेचे पाणी ' या शीर्षकाने डॉ. एस्. जी. यांचे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. ओघवत्या शैलीतील त्यांचे विश्लेषण आणि मांडणी वेधक आहे. 

 त्यांच्या जीवनातील आदर्श प्रवास पाहून  रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.  जुन्या काळातील अकोलेतील डॉ. एम्. ए. फारुकी, डॉ . इर्शादभाई फारुकी, डॉ . सी . पी. देशपांडे, डॉ . वि . ह. जुगादे यांच्या जाण्यानंतर डॉ. एस्. जी. यांची एक्झिट अस्वस्थ करणारी.अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक निष्णात, निष्ठावंत, सोज्वळ आणि प्रामाणिक व्यक्तित्व डॉ. शिवाजी उर्फ एस्. जीं. च्या जाण्याने हरपले  असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनिल शिंदे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post