श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट अकोले आयोजित त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सवाने अगस्ति आश्रम परिश्रम उजाळला...





श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट अकोले आयोजित त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सवाने अगस्ति आश्रम परिश्रम उजाळला...


अकोले प्रतिनिधी- श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट अकोले आयोजित त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव उत्साहात संपन्न झाला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगस्ति आश्रमावर त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.या दीपोत्सवामुळे सर्व अगस्ति आश्रम परीसर उजाळून निघाला होता. या दीपोत्सव मध्ये शेकडो नागरिक सहभागी होऊन या नयनरम्य दीपोत्सवाचा आनंद लुटला.यावेळी अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह टाळता आला नाही.   तसेच श्री अगस्ती ऋषी रचित आदित्य हृदय स्तोत्र या पुस्तिकेचे द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले.  



प्रतिवर्षी अगस्ति आश्रमावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हजारो पणत्यांच्या प्रकाशात आश्रम उजळवण्यात येतो यामध्ये अनेक समाजसेवी संघटना चा समावेश असतो त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव हा देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो. आश्रमाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांची आहे . याही वर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अगस्ति देवस्थान ट्रस्ट व अगस्ति ऋषी गुरुकुल च्या विशेष सहभागाने हा उत्सव आनंददायक झाला .



शेकडो भाविकांची उपस्थिती उत्सवाचा उत्साह वाढवणारी होती . प्रतिवर्षी या उत्सवाला भाविकांचा प्रतिसाद वाढत आहे.  यावर्षी आदित्य हृदय स्तोत्र या ग्रंथाची द्वितीय आवृत्तीची छपाई अकोल्यातील व्यापार व्यवसाय क्षेत्रातील व धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या चोथवे परिवाराच्या माध्यमातून दत्तात्रय शेठ चोधवे यांच्या प्रेरणेने संगमनेर येथील प्रसिद्ध युवा उद्योजक संदीप चोथवे यांनी दहा हजार आवृत्तींची छपाई केली. त्याचे प्रकाशन डॉ संजय मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले.



यावेळी त्यांनी आश्रमाचा होत असलेला विकास पाहून आनंद वाटला असे मत व्यक्त केले.त्यासाठी ॲड. के.डी.धुमाळ  व सर्व विश्वस्त मंडळाचे विशेष कौतुक डॉ. संजय मालपाणी यांनी केले . येणारा कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून अगस्ति महाराजांच्या मंदिराचे व कार्याचे वेगवेगळ्या स्तरावर प्रचार प्रसार करण्यात यावा व कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशातील येणारा साधू समाज व भाविक यांची अगस्ती आश्रमावर दर्शनाच्या निमित्ताने गर्दी व्हावी यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना डॉ.संजय मालपाणी यांनी दिल्या. 



या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ चावडे यांनी  दरवर्षी प्रमाणे आपल्या पत्नी स्वर्गीय सखुबाई चावडे यांच्या स्मरणार्थ शालेय गरीब विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप केले. व अन्नदान केले. त्यांच्या या कार्याचे अगस्ति देवस्थानचे अध्यक्ष के डी धुमाळ यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अगस्ती देवस्थानचे विश्वस्त गुलाबराव शेवाळे, किसन शेठ लहामगे, रामनिवास राठी, सतीशशेठ बुब,ह.भ.प.दिपक महाराज देशमुख, राजेंद्र महाराज नवले,गणेश महाराज वाकचौरे ,मच्छिंद्र भरीतकर,प्रा. गणपत नवले  ,रविंद्र चोथवे ,उपप्राचार्य दीपक जोंधळे  आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानचे व्यवस्थापक रामनाथ मुतडक यांनी विशेष परिश्रम घेतले .स्वागत व सूत्रसंचालन ह भ प दीपक महाराज देशमुख यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post