कालभैरव जयंती निमित्त दीपोत्सव भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
अकोले(प्रतिनिधी )-अकोले शहरातील प्राचीन कालभैरव मंदिरात कालभैरव जयंती निमित्ताने शेकडो पणत्या प्रजवलीत करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सिद्धेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शहरातील प्रवरा नदीच्या कडेला प्राचीन सिद्धेशवर मंदिर असून इथे कालभैरवाचेही स्वतंत्र मंदिर आहे. कालभैरव जयंतीच्या निमित्ताने इथे दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते,तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. याही वर्षी पहाटेपासूनच भाविकानी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती .
सिद्धेश्वार मंदिरातही काल भाविकांनी शिवलीला अमृताचेही पठण केले. सिद्धेशवर मंदिर हे एक शिल्पकलेचा उत्तम नमुना असून सायंकाळच्या आरती नंतर पणत्या प्रजवलीत करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सर्व पणत्या प्रजवलीत झाल्यावर हे दृश्य पहाण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईल मध्ये हि फोटो घेतानाची स्पर्धाच जणू इथे पहायला मिळाली. असंख्य दिव्यांनीहा परिसर उजळून निघाला होता.
