मेहंदुरी येथे २५ नोव्हेंबरला भव्य सत्संग मेळावा
अकोले ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मेहंदुरी येथे श्री स्वामी समर्थ मंदिर दरबार स्थापना निमित्त तालुका स्तरीय भव्य सत्संग मेळावा गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे.
परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने मेहंदुरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती व प्रतिमेची स्थापना करण्याच्या निमित्ताने गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे हे आपल्या अमृततुल्यवाणीतून भाविकांशी हितगुज साधणार आहे. या निमित्ताने सत्संग मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
या निमित्ताने अकोले तालुक्यातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्र दरबारामध्ये भाविकांचे छोटे छोटे मेळावे घेऊन या कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार करण्यात आला. तालुक्यात सर्व गावांमध्ये फ्लेक्स लावून वातावरण निर्मिती केली आहे.
तरी सेवेकरी, भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.