अकोले प्रतिनिधी- आदिवासी उन्नती सेवा मंडळ संचलित अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा कोथळे( कॅम्प अकोले )च्या वतीने आज निसर्गवासी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष कचरे ( माजी प्राचार्य मॉडर्न हायस्कूल) हे होते .यावेळी आदिवासी समाजाचे अभ्यास प्रा. डॉ. सुनील घनकुटे सर प्रमुख पाहुणे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख आदिवासी उन्नती सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष भरतराव घाणे संचालक सुनील सारोक्ते आदीसह माध्यमिक मुख्याध्यापक श्री.शिवराम कोंडार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम. मंजुषा घोडके मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनील घनकुटे यांनी निसर्गवासी वंदनीय पिचड साहेबांच्या जलक्रांतीच्या कार्याविषयी लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य संतोष कचरे त्यांनी साहेबांच्या शैक्षणिक जीवन व कार्याविषयी बोलताना ते किती महान होते याचे अनेक दाखले उदाहरणे दिले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर मिळवलेले घवघवीत यशाबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत शिवराम कोंडार प्रस्ताविक सुरेश पवार सूत्रसंचालन अनिल हासे तर आभार वंदना घुले यांनी मानले. यावेळी प्रेम भांगरे ,सुप्रिया भांगरे, राशी पोकळे ,शेजल मधे, शितल पोटकुले, निशा मेंगाळ, राणी नाडेकर या विद्यार्थ्यांनी साहेबांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
