ॲड मनोहरराव देशमुख यांनी अनेक पाखरांना पंख दिले | ' कृतार्थ 'चा प्रकाशन सोहळा संपन्न


 ॲड मनोहरराव देशमुख यांनी अनेक पाखरांना पंख दिले


' कृतार्थ 'चा प्रकाशन सोहळा संपन्न

अकोले प्रतिनिधी-

ॲड मनोहरराव देशमुख यांनी राजूर सारख्या आदिवासी भागात महाविद्यालय सुरू केले, अनेक पाखरांना पंख दिले. प्रत्येकाची महत्वाकांक्षा जागृत केल्या.इथल्या मातीत जो घडला तो उच्च शिक्षित झाला असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. एस. झेड. देशमुख यांनी केले.

    ॲड्. देशमुख यांचे सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक , आध्यात्मिक व सामाजिक कार्याचा वसा घेणाऱ्या एका विधी तज्ज्ञाचा पट मांडणाऱ्या प्रा.डॉ. डी.के.गंधारे यांनी संपादित केलेल्या  ' कृतार्थ ' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा  येथील देशमुख महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी प्रा. देशमुख बोलत होते. आमदार डॉ किरण लहामटे , मुंबई येथील शिक्षणतज्ज्ञ,उद्योजक महेश  शेट्टी ,उद्योजक  डॉ श्रेणीक  कोटेचा , संस्थेचे सचिव एम. एल. मुठे, कोषाध्यक्ष विवेक मदन ,अमित भांगरे,ॲड देशमुख यांचे नातेवाईक ,सत्यनिकेतन परिवारातील सर्व सदस्य,ग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थित होते.

      ॲड्. देशमुख यांनी आदिवासी भागात ज्ञान दानाचे सर्वात मोठे कार्य केले. महाविद्यालय नसते तर या भागातील अनेक  विद्यार्थी बारावी नंतर घरीच बसले असते.वृध्दाश्रम सुरू केल्यामुळे अनेक वृध्दांना हात देण्याचे काम त्यांनी केले,सामाजिक कामातही ते सातत्याने पुढे आहेत म्हणून त्यांचे काम एका दीपस्तंभा सारखे असल्याचे प्रतिपादन आमदार लहामटे यांनी केले.

या कार्यक्रमामुळे आपणास प्रेरणा मिळाली असून घेतलेला हा वसा असाच पुढे पुढे सुरू ठेवणार असल्याचा विश्वास सत्काराला उत्तर देताना ॲड्. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.  संस्थेच्या वतीने यावेळी देशमुख यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी.वाय. देशमुख यांनी केले . प्रास्ताविकात माजी प्राचार्य टी.एन. कानवडे यांनी ॲड्. देशमुख यांचा जीवनपट उलगडला.

 यावेळी देशमुख यांचे जावई साखर आयुक्त मंगेश तिटकारे,महेश  शेट्टी , शिक्षणतज्ज्ञ डॉ श्रेणीक  कोटेचा, प्रा डॉ नितीन तळपाडे,अमित भांगरे यांनी आपल्या मनोगतातून ॲड्. देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला.

 माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही शुभेच्छा दिल्या.संपादक प्रा. डॉ. गंधारे, मुखपृष्ठाचे चित्रकार मिनानाथ खराटे,प्रकाशक सविता पाचपुते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. संतराम बारवकर,धनंजय पगारे,दीपक पाचपुते यांनी सूत्रसंचालन केले तर माजी प्राचार्य विलास नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post