इ१०/१२ वि च्या परिक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या निर्णयावर बहिष्कार टाकण्याचा मुख्याध्यापक संघटना व इतर शिक्षक संघटनेचा निर्णय
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका असून एस.एस.सी,व एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांची केंद्रात आदला बदल करणार असल्याने विद्यार्थी,शिक्षक ,यांचे मोठे हाल व हेळसांड होणार असून विद्यार्थी देखील शाळा बाह्य होणार असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने हा निर्णय बदलावा अन्यथा मुख्याध्यापक व शिक्षक संघटना यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतील असा इशारा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील धुमाळ यांनी दिला. आज अकोले तालुका पंचायत समिती येथे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक संघटना,पालक संघटना ,संस्थाचालक ,विद्यार्थी संघटना यांनी बैठक घेऊन बोर्डाचा शिक्षकावर विश्वास नसेल व हा निर्णय बदलला नाही तर परिक्षावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज अकोले येथे गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून उद्या पुणे येथे परीक्षा मंडळाचे अध्यक्ष यांना भेटण्यासाठी शिष्ट मंडळ जाणार आहे.त्यानंतर आमची भूमिका अधिक स्पष्ट करू असे मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील धुमाळ यांनी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की,अकोले तालुका हा आदिवासी डोंगराळ असून येथील विद्यार्थी आदिवासी भागात अधिक राहतात ,इ. १०वी व१२वी चे परीक्षा केंद्र हे देखील अतिदुर्गम भागात आहेत.त्याच प्रमाणे बहुतांशी शाळा या आश्रमशाळा असून या शाळांवर असणारी शिक्षक संख्या कमी आहे .जी स्थिती आश्रमशाळांची तीच स्थिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची असून केंद्रातील अंतर १०ते १५ किलोमीटर इतके आहे .परीक्षा केंद्राचे संचालक व पर्यवेक्षक यांच्या आदल बदल करण्यात आला असून त्यामुळे केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांची हेळसांड झाली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रावर नेण्यासाठी वाहने व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी करतात त्यामुळे नवीन येणारे केंद्रसंचालक ,सुपरवायझर यांना हे नियोजन करणे अवघड होणार आहे.त्यामुळे परीक्षा केंद्रावर ताण तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. परीक्षा कालावधीत केंद्राचे शालेय व्यवस्थापन व प्रशासन कोलमडणार आहे . परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे .तर परीक्षा कालावधीत विद्यालयातील शिक्षक कर्मचारी नसल्याने शाळा बंद पडतील.तसेच इयत्ता १ली ते ९वी ११वी चे वर्ग बंद ठेवण्याची वेळ येणार आहे.त्यामुळे शैक्षणिक कामकाज कोलमडण्याची शक्यता आहे . त्यास सर्वस्वी परीक्षा मंडळ जबाबदार असेल त्यामुळे मंडळाने जुन्या पद्धतीने परीक्षा घ्याव्यात अन्यथा परिक्षावर बहिष्कार टाकावा लागेल असा इशारा देण्यात इशारा यावेळी देण्यात आला. आहे .
या निवेदनावर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील धुमाळ, सचिन वाकचौरे,तुकाराम कानवडे, शांताराम मालूजकर व शिक्षक व माध्यमिक शिक्षक संघटना ,शिक्षकेतर संघटना, शिक्षक परिषद, शिक्षक भारती संघटना ,शैक्षणिक संस्था संघटना यांनी सह्या केलेल्या आहेत.
परीक्षा मंडळाचा या निर्णयाचा निषेध करून निर्णय बदलण्याची मागणी केली असून हा निर्णय बदलला नाही तर परिक्षेवर बहिष्कार टाकणार आहे .असे शिक्षक संघटनेचे राजेंद्र गवांदे यांनी सांगितले,तर शिक्षकावर विश्वास नसतील तर इतर यंत्रणेची मदत घ्यावी आम्ही परिक्षेवर बहिष्कार टाकत आहोत असे मत संस्था चालक माधव गभाले यांनी व्यक्त केले .
परीक्षा मंडळाने कोणताही अभ्यास न करता सरमिसळ करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून आदिवासी भागातील व शहरी भागातील परिस्थिती वेगळी असून त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा व परीक्षा पद्धत आहे तशीच ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे .
