टाकळी शाळेत संसर्गजन्य रोग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन




 टाकळी शाळेत संसर्गजन्य रोग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 अकोले प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथे मंगला नर्सिंग कॉलेज अकोले व केंद्रशाळा टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण कसे करावे? या संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नर्सिंग कॉलेजचे प्रा. शुभम शिंदे, प्रा.ठोंबरे व प्रशिक्षणार्थी नर्सिंग विद्यार्थीनी यांनी विद्यार्थ्यांना घटसर्प, डोळे येणे, धनुर्वात, मलेरिया, टायफॉइड, चिकून गुणिया, डेंग्यू,  हिवताप या आजारांची लक्षणे व त्यांवरील उपाययोजना यांबाबत दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार हे होते तर शिबिर समन्वयक म्हणून उपाध्यापक संजय देशमुख व संजय शिंदे यांनी काम बघितले. स्वयंसेवक निता लेंभे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल देवठाण बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड व टाकळी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे यांनी टाकळी शाळेचे विशेष अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post