रविवार दि 23 मार्च 2025 उल्हास कार्यक्रम अंतर्गत, असाक्षरांची मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान यावर मूल्यमापन चाचणी




रविवार दि 23 मार्च 2025 उल्हास कार्यक्रम अंतर्गत,
असाक्षरांची मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान यावर  मूल्यमापन चाचणी


अकोले प्रतिनिधी- 

अकोले तालुक्यातील असाक्षरांची उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत  पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान वर  मूल्यमापन चाचणी रविवार दि.२३ रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार असल्याची माहिती , पंचायत समिती चे गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी दिली.  सदर परीक्षा ही असाक्षरांच्या सोयीनुसार घेतली जाणार आहे.

सदर परीक्षेसाठी २५४९ असाक्षर परीक्षेला बसणार असून ही परीक्षेसाठी तालुक्यातील प्रत्येक जि.प.प्राथमिक शाळा ही परीक्षा केंद्र असणार आहे.  त्या जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक परीक्षा केंद्र संचालक असणार आहेत .  तरी तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख, स्थानिक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य यांनी आपल्या जवळच्या, ओळखीच्या असाक्षर  नागररिकांना परीक्षेस बसण्यासाठी प्रवृत्त करावे, व सदर परीक्षेसाठी सर्व १०० % असाक्षर परीक्षेला बसतील या साठी सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post