गुरुमाऊली यांचे अभिष्टचिंतन सोहळ्यात अकोलेकरांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष


 गुरुमाऊली यांचे अभिष्टचिंतन सोहळ्यात अकोलेकरांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष


 दुतर्फा रांगोळीने सजलेला राजमार्ग, सुंदर फुलांनी सजवलेला रथ,त्यावर विराजमान झालेले संत तुकाराम महाराज यांची पगडी धारण केलेले प.पू. गुरुमाऊली  त्यांच्या समवेत सितामाईच्या रुपात ताईसाहेब... रथाच्या पाठीमागे  गुरुपुत्र चंद्रकांत दादा, आबासाहेब,  नितिनभाऊ..

 समोर आदिवासी नृत्याचे विविध रंग, वारकरी शिक्षण संस्थेचे चिमुकले वारकऱ्यांचे नृत्य,सजलेल्या नटलेल्या  फेटे बांधलेल्या महिला सेवेकरी व पुरुष सेवेकरी समवेत दांडपट्टा,लाठी काठी यांच्या विविध प्रयोगाने रंगलेली मिरवणूकीने उपस्थित सेवेकरी भारावून गेले.

 श्री स्वामी समर्थ गुरुपिठाचे पिठाधिश प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गुरुपीठ त्रंबकेश्वर येथे अकोलेकरांनी मिरवणूक काढली होती.या मिरवणूकीने सर्व सेवेकऱ्यांचे लक्ष वेधले.


                                    


  यावेळी गुरुमाऊली यांची ग्रंथतुला  करण्यात आली.तसेच विविध स्तरातून आलेले लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राज्यातून आलेले महिला व पुरुष सेवकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 यावेळी गुरुमाऊली यांचे हितगुजपर मार्गदर्शन करताना म्हणाले की, घराघरात श्रावणबाळ व पुंडलिक तयार होणे गरजेचे आहे. येथे अनाथ मुलांना सनाथ करण्यासाठी कार्य चालु असून वृद्धाश्रम बंद झाले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली.प्रश्नोत्तर माध्यमातून अनेकांचे  विणामुल्य प्रश्न सोडविले  जातात .स्वामींचे कार्य घराघरात पोहोचविण्याचे काम करावे. ग्राम अभियानअंतर्गत विवाह मंडळाच्या विभागाने विना हुंडा,विना खर्च विवाह केले जातात.

Post a Comment

Previous Post Next Post