प्रति आयोध्या श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक येथे भव्य श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा..!!




 प्रति आयोध्या श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक येथे भव्य श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा..!!


अकोले : अकोले तालुक्यातील प्रभू श्रीरामांच्या व श्री सद्गुरू यशवंतबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे उंचखडक बुद्रुक.अगस्ती ऋषींचे मोठे बंधू महामती ऋषी यांचे वास्तव्य असलेले ठिकाण म्हणजे उंचखडक बुद्रुक येथील प्रवराकाठी वसलेले श्री क्षेत्र राममाळ जे सध्या प्रति आयोध्या म्हणून नावारूपाला येत आहे याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी वास्तव्य केल्याचे अनेक पुरावे या ठिकाणी आढळतात,प्रभू श्रीरामांच्या पादुका देखील या ठिकाणी आढळलेल्या आहेत.याच भूमीत श्री सद्गुरू यशवंतबाबांनी श्रीरामनवमीच्या सप्तहास सुरवात केली असे म्हटले जाते की पूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात एक श्रीरामपूर व दुसरे म्हणजे अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील श्री क्षेत्र राममाळ या दोनच ठिकाणी श्रीरामनवमीचा उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात येत आहे म्हणून या ठिकाणाला पौराणिक इतिहास लाभलेला असल्या कारणाने अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे भव्य दिव्य असे मंदिर बनावे अशी अनेक भाविक भक्तांची इच्छा होती.

 त्याप्रमाणे येत्या ३१ मार्च २०२५ ते ०२ एप्रिल २०२५ या कालावधीत प्रति आयोध्या श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक या ठिकाणी भव्य श्री राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी आयोध्याधाम,उत्तर प्रदेश येथील योगी सोमेशनाथ महाराज,जोग महाराज भजनी मठ इगतपुरी येथील महान तपेनिधी ह.भ.प. माधव महाराज घुले,श्री क्षेत्र आळंदी येथील शांतिब्रम्ह ह.भ.प.डॉ.नारायण महाराज जाधव तसेच परिसरातील संतवृंद व समस्त वारकरी सांप्रदाय महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठया दिमाखात साजरा होणार आहे. कलशारोहन सोहळा हा मिती चैत्र शु ll शके १९४७ बुधवार दिनांक ०२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता होणार आहे.



या सोहळ्याचे आचार्य हे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील धर्मशास्रचार्य ह.भ.प. जगदीश महाराज जोशी हे असणार आहेत.सालाबादप्रमाणे याठिकाणी रविवार ३० मार्च २०२५ गुढीपाडवा ते ०७ एप्रिल २०२५ पर्यंत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सप्ताह संपन्न होत आहे तरी दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता धर्मद्वजारोहन लोकप्रिय आमदार डॉ किरणजी लहामटेसाहेब यांचे हस्ते संपन्न होणार आहे तरी या धार्मिक कार्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.

या संपूर्ण सप्ताह काळात महाराष्ट्र राज्यातील नामांकित कीर्तनकारांचे रोज सायंकाळी ०७:०० ते ०९:०० या वेळेत हरिकीर्तन होणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शक प.पु.योगी केशवबाबा चौधरी,समाज प्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर),मनोहर महाराज भोर,ह.भ.प.विठ्ठलपंतजी गोंडे महाराज(श्री क्षेत्र राममाळ) हे असणार आहे.रविवार दिनांक ०६ एप्रिल २०२५ रामनवमीच्या दिवशी प्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन ठीक सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत व सोमवार दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ०९:०० ते ११:०० वाजता ह.भ.प.महंत आदिनाथ महाराज शास्त्री, तारकेश्वरगड पाथर्डी यांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

सद्गुरू यशवंत बाबा धार्मिक ट्रस्ट उंचखडक बु चे अध्यक्ष सावंतसाहेब,उपाध्यक्ष अशोकराव देशमुख,सचिव योगी केशवबाबा चौधरी,महंत विठ्ठलपंत गोंडे महाराज समस्थ विश्वस्त मंडळ,उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायत,विविध कार्यकारी सोसायटी,सर्व दूध उत्पादक सहकारी संस्था,सहकारी संस्था यांच्या वतीने तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की या निमित्ताने भव्य यात्राउत्सव होत आहे तरी सर्व भाविकांनी या आतमोधारी संधीचा लाभ घ्यावा आपण सर्वांनी आपले नातेवाईक,मित्रपरिवार यांनी या धार्मिक कार्यास उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Post a Comment

Previous Post Next Post