महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेचा तृतीय वर्धापन
महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेचा तृतीय वर्धापन दिना निमित्त भव्य बॉयलर अटेंडंट कामगार मेळाव्या शुक्रवार वार दि.२१ मार्च रोजी कै भिकोबा तांबे सभागृह बारामती या ठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स.तु बधे(मा.सहसंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य ) यांनी भूषविले तर उदघाटन उ.शं.मदने(मा.सहसंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य )यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गजानन चौगुले(मा.सहसंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य ) यांनी बॉयलर परीक्षा संदर्भात माहिती व बॉयलर विषयी मार्गदर्शन केले. स.तु.बधे (सहसंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य ) बॉयलर क्षेत्रात भरीव कामगिरी अमूल्य अशा योगदानाकरिता यांना सन्मानपत्र गौरवपूर्ण प्रदान करण्यात आले.
तसेच उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते
वैजनाथ पाटील (जिल्हा कोल्हापूर),
जगदीश उंबरे (जिल्हा सांगली),
लहू सेप (जिल्हा बीड),
हनुमान ठोंबरे (जिल्हा सातारा),
नागनाथ पवार (जिल्हा सोलापूर)
यांना देण्यात आला.
सन - २०२५ या वर्षात BOE परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आले. संघटनेचे राज्य सहसचिव शशिकांत पवार यांची कन्या वृषाली शशिकांत पवार,डॉक्टरेट पदवी (Ph/D)फिलासाॅफर ऑफ डाॅक्टरेट इन आर्किटेक्ट अमेटी युनिवर्सिटी नोएडा दिल्ली,भारत यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल,सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गौरविण्यात व सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांनी बाष्पकाचा सुरक्षित वापर करण्यासंदर्भात बाष्पक परिचारांना मार्गदर्शन करण्यात आले. बॉयलर परिचर परीक्षेच्या तयारीसाठी अंकुश वाकचौरे यांच्या वाढदिवसानिमित्त टिफिन बॅग, कॅलेंडर वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष अंकुश वाकचौरे तर सूत्रसंचालन अनिल सावळे यांनी केले. आभार उपाध्यक्ष चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी व्ही आर बॉयलर बारामती,शिवम सेल्स अँड सर्व्हिसेस बारामती ,मराठा इंटेलिजन्स सिक्युरिटीचे बारामती, प्रिव्हेनज बिकसन्स बॉयलर्स विमाननगर, एस्बी पावर सोल्युशन प्रा लि इंदापूर , राखो इंडस्ट्रीज भोसरी,यश इंजिनिअरिंग बारामती,संस्कार इंजीनियरिंग वर्क्स संभाजीनगर यांचे विशेष सहकार्य लाभले.
बाष्पके क्षेत्रासाठी उपयुक्त विषयावर प्रत्येक रविवारी बॉयलर क्षेत्रातील मान्यवरांचे ऑनलाईन मार्गदर्शन, बॉयलर क्षेत्रातील कामगारांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या वतीने सतत प्रयत्न करणे, सन-२०२५ साठी दिनदर्शिका नऊ हजार तयार करून संपूर्ण महाराष्ट्रातभर प्रत्येक जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना कॅलेंडर मोफत वाटप केले. कॅलेंडरमध्ये बॉयलर विषयी माहिती प्रत्येक पानावरती प्रकाशित केलेली आहे.
प्रथम व द्वितीय श्रेणी बाष्पक परिचय क्षमता परीक्षा सन-२०२५ साठी प्रत्येक रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रातील ७ प्रादेशिक कार्यालय विभागामध्ये ऑफलाईन मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात येणार आहे,
बॉयलर परिचर परिक्षेला बसवण्यासाठी संघटनेच्यावतीने संपूर्ण माहिती दिली जाईल,संघटना पूर्ण क्षमतेने काम करेल असे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
