श्री क्षेत्र लिंगदेव येथे अवतरणार साक्षात रामायण महाभारतातील दृश्य ....
लिंगदेव (प्रतिनिधी ) :- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठया उत्साहात साजरा होत आहे . लिंगेश्वर यात्रा उत्सव म्हणजे लिंगदेव पंचक्रोशीतील व तालुक्याच्या लोकांच्या आनंदाची पर्वणी . श्रद्धा व विश्वास नवसाला पावणारा भगवान श्री लिंगेश्वर निरागर निखळ आनंद प्रत्येकाच्या ठायी ठायी दिसते . यावर्षीची हि पर्वणी आज मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुढीपाडवा ) शके १९४७ रविवार या दिवशी यात्रोत्सव सुमांगल्य पूर्ण रूपाने संपन्न होत आहे .महाराष्ट्रात नावाजलेली व नाविण्यपूर्ण असलेली धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा एकतेचा संदेश देणारे धर्मोत्वासाचे पर्व आजही २५ व्या शतकातही स्थान महात्म्य व काल महात्म्य टिकुन आहे . याचे कारण अत्यंत जागृत व जवल्य असे लिंगेश्वराचे स्थान व लिंगेश्वरावर असलेली अपार श्रद्धा हे होय.
भल्या पाहटेपासुन धार्मिक विधी सुरु होतात पाहाटे ४ ते ५ महापुजा , ५ ते ६ मुगुट चढविणे , ६ ते ७ वस्र अलंकार चढविणे , ७ ते ८ महाआरती तसेच भव्य शोभा यात्राने यात्रेचे रंगत वाढत जाते.श्री लिंगेश्वर भजनी मंडळ व जयशंकर ढोल तशा ध्वज पथक अकोले यांचे काढून शोभा यात्रेची रंगत वाढणार आहे गेल्या दोन वर्षापासून लेझीम या आपल्या पारंपारिक खेळाला विशेष महत्व देउन लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टने राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचे आयोजन केले आहे.हि लेझीम स्पर्धाही या यात्रेची विशेष असे आकर्षण ठरत आहे . या लेझीम स्पर्धेसाठी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे .
दशावतारी कला आज महाराष्ट्रात नामशेष होण्याच्या मार्गावर असताना लिंगदेवकरांनी ती जोपासली , वाढविली , जपुन ठेवुन त्यामध्ये चैतन्य व संस्कृतीच्या पाऊल खुणा येथे पदोपदी उमटताना दिसुन येतात .अशी चालते लिंगेश्वरांची संगीत आखाडी ताल से ताल … कदम से कदम बाजू से बाजू …… महादेवाची स्वारी येत आहे , गलबत मत करो,,,,,,, च्या ललकारीने सनईच्या सुरात व तुतारीच्या निनादात डफ , संबळ हलगी व नादमधुर सूर व डफावरील पहीली थाप पडताच अंग शहारलं जात , सर्वांची पाऊले थिरकतात पात्र घेणारी व्यक्ती तालाच्या ठेक्यावर नाचतात , हे नाचणे फुकट नाही हो हजारो रुपये लिलावात बोली लावुन तो लिलाव घ्यावा लागतो व आपले कौशल्य दाखविले जाते.
विद्युत रोषनाई , फटाक्याची आतिषबाजी , वाद्याच्या गजरात सूत्रधाराची स्वारी अवतरते तत्पूर्वी आखाडीचे उद्घाटन व दीपप्रज्वलनाने सुरुवात होते.उद्घाटन करण्यासाठी देवस्थानाला आर्थिक निधी मिळतो ह्या आखाडी यात्रेच्या लिलावाची सुरुवात भगवान लिंगेश्वर नंदादीप ५२ किलो तेल देऊन युवा उद्योजक प्रमोद भाऊसाहेब पवार यांनी ४६००० रुपये देऊन हा लिलाव पटकावला , नंदादीप श्री दत्त १३ किलो तेल देऊन सदाशिव भिमाजी कानवडे यांनी १६००० रुपये किमतीला हा लिलाव घेतला , नंदादीप नवीन १३ मूर्ती २६ किली तेल देऊन बाळासाहेब विठ्ठल कोरडे यांनी १२१०० रुपये ,भगवान लिंगेश्वर अभिषेक महापुजा लिगेश्वरपतसंस्था कॅशिअर सुरेश रामभाऊ पवार ३५००० रुपये . भगवान लिंगेश्वर वस्रअलंकार चढविणे विलास दत्तु फापाळे ६००० रुपये ,भगवान लिंगेश्वर महाआरती युवा उद्योजक ऋषिकेश दगडू पवार ७१००० रुपये यांनी पटकाविला .
या संगीत आखाडीचे यात्रेचे उद्घाटन इमेज हॉलिडेज अकोलेचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी युवक कार्याध्यक्ष हरिभाऊ मंजुळ फापाळे व श्रमिक ऑटोमोबाईल अकोले संचालक राधाकिसन मंजुळ फापाळे यांनी ६०००० रुपये सर्वाधिक बोली लावून पटकाविला तर दीप प्रज्वलन लिंगदेव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अमित राणेश घोमल यांनी ४५००० रुपयांना रोख बोली लावून पटकाविला .या संगीत आखाडीचे मुख्य आकर्षण व पहिले पात्र सुत्राधारासाठी लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त बन्सी पोपट कानवडे व समित राणेश घोमल यांनीसर्वाधिक ७०५०० बोली लावली, मच्छ अवतार – भूषण भाऊसाहेब कोरडे ११००० रुपये , मच्छ दैत्य – धवेंद्र देवराम आढाव ६००० रुपये , भिल्ल भिल्लीण – किरण चंद्रभान होलगीर १५००० रुपये कच्छ अवतार माणिक प्रभाकर फापाळे ९५०० रुपये , कच्छ दैत्य नितीन भानुदास कानवडे ७४०० रुपये वराह अवतार संकेत शरद फापाळे ११००० रुपये , वराह दैत्य इंजी जालिंदर भिमाजी कानवडे कानवडे ६००० रुपये ,राजा हिरण्य कश्यपु मुंबई पोलीस भाऊसाहेब बन्शी होलगीर ७५००० रुपये , नरसिंह अवतारसोमनाथ हरिदास फापाळे ८१०० रुपये , त्राटिका इंजी मनोज बाळासाहेब कानवडे ,त्राटिका राम लक्ष्मन सतीश राजाराम जाधव व संजय रामभाऊ फापाळे ३१००० रुपये , श्रुपनखा संतु लक्ष्मण कानवडे १८५०० रुपये , श्रुपनखा राम लक्ष्मण विलास दत्तु फापाळे २२००० रुपये , वाली सुग्रीव राजेंद्र ज्ञानदेव हाडवळे १८००० रुपये ,राम परशुराम मंगेश संतू कानवडे १४५०० रुपये ,ह्या आखाडी यात्रेतील सर्वात जास्त बोली असणारे पात्र म्हणजे इंद्रजीत इंजी अमोल दत्तात्रय फापाळे १,११,००० रुपये , कुंभकर्ण अभिजित भाऊसाहेब फापाळे १७००० रुपये, राम लक्ष्मण कुंभकर्ण मुंबई पोलीस भीमाशंकर ठकाजी होलगीर ३०५०० रुपये , रावण मेजर राजेंद्र ज्ञानदेव हाडवळे ७६५०० रुपये ,रावण राम लक्ष्मण साईनाथ ठका पवार २२०००बकासुर प्रगतीशील शेतकरी मनोहर कान्हू फापाळे २२००० रुपये ,भीम इंजी राहुल राहुल मनोहर फापाळे ६००० रुपये यमराज अमोल दत्तात्रय फापाळे ४२००० रुपये ,सत्यवान सावित्री अतुल मारुती कानवडे १५३०० रुपये ,अर्जुन दुर्योधन ,अनुमान श्रीकृष्ण भीम अर्जुनवाशी मार्केट व्यापारी संदीप बाळासाहेब फापाळे ५०००० रुपये ,शेंडी नक्षत्र संजय उत्तम हाडवळे ५५०० रुपये ,एकादशी – धोंडीबा केरू पवार ११००० रुपये ,दैत्य एकादशी श्रीकांत दगडू पवार ५६०० रुपये ,वेताळ- भास्कर चिमाजी शिंदे३१०००रुपयेकर्ण श्रीकृष्ण अर्जुन धोंडीबा केरू होलगीर २२५०० रुपये ,दुर्योधन कैलास ठका होलगीर १३५०० रुपये ,भीम दुर्योधन गोपाल सोपान हाडवळे ८५०० रुपये ,चंद्र सूर्य तुषार रंगनाथ पवार २०००० रुपये ,वीरभद्र लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त रामकृष्ण बाबुराव कानवडे १०५०० रुपये ,वीरभद्र दैत्य परशुरामबाबुरावकानवडे६०००रुपये,रक्तादेवीराकेश सूर्यभान घोमल ८००० रुपये ,रक्तादेवी दैत्य सागर रंगनाथ कानवडे ५६०० रुपये ,भस्मासुर शुभम सुरेश कानवडे ८००० रुपये ,मोहिनी आयुष संदीप फापाळे ४५०० रुपये ,दैत्य वेताळ डॉऋषीकेश रावसाहेब कानवडे ९००० रुपये ,खंडेराय एकनाथ मधुकर कोरडे ४२००० रुपये ,वाघ्या मुरली राहुल देवराम कोरडे १८००० रुपये ,अभिमन्यु प्रगतशील शेतकरी अनिल राधुजी हांडे २२१०० रुपये ,लेझीम सुरेश उत्तम हाडवळे ७०० रुपये ,घटोत्कच प्रगतशील शेतकरी धोंडीबा विष्णु कानवडे २५००० रुपये ह्या सर्व गावातील भूमिपुत्रांनी जास्तीत जास्त रोख बोली लावून संगीत आखाडी पात्रांचा लिलाव पटकाविला .ह्या सर्व भूमिपुत्रांचे भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट व लिंगदेव ग्रामस्ताकडून अभिनंदन करण्यात आले .
गावातील हॉटेल व्यावसायिक गुढी पाडव्यासाठी आवश्यक असणारी गुडीशेव , रेवडी तयार करण्यात गुंग झालेली आहे . बहुतेक गावात गुडीशेव रेवडी हि भगवान लिंगेश्वराच्या यात्रे पासुन पहावयास मिळते आहे .गुढी पाडव्याचा यात्रोत्सव चांगल्या प्रकारे साजरा होण्यासठी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट , लिंगदेव यांच्याकडून विविध प्रयत्न होत आहे . या यात्रोत्सवासाठी महाराष्ट्रातुन शिवभक्त हजर राहत असतात . मागीलकाही वर्षापासून अकोले व संगमनेर तालुक्यातील लेझीम स्पर्धेचेही आयोजन केले जात आहे व या यात्रे निमित्त आपली लेझीम कला कौशल्य सादर करण्याची संधी मिळत आहे . या लेझीम पथकात चांगल्या प्रकारे कौशल्य दाखविणाऱ्या संघासाठी बक्षिसांचे आयोजन लिंगेश्वर देवस्थान तर्फे करण्यात आले आहे . मागील काही वर्षापासुन विदेशीपाहुणेही या यात्रा उत्सवासाठी हजेरी लावत आहे . त्यामुळे या यात्रोत्सवाची लीला हि विदेशातही जाऊन पोहचलेली आढळून येत आहे. हा यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट ,ग्रामपंचायत लिंगदेव व लिंगदेव ग्रामस्थांकडून चोख नियोजन केले जात आहे .या यात्रा उत्सवासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट व लिंगदेव ग्रामस्थांकडून केले आहे. या यात्रा उत्सवाचे कॅलेंडर सहकार्य श्री.चंद्रभान सखाराम बारवे यांचे कडून सालाबाद प्रमाणे याही वर्षी करण्यात आले आहे .
तसेच मागील वर्षी सर्वात जास्त देणगीदारास भगवान लिंगेश्वराचे व द्वितीय देणगीदारास पार्वतीचे पात्र दिले जाते हा मान भगवान लिंगेश्वर पात्र निवृत्त मुख्याध्यापक श्री.पोपटराव बबन कदम यांना मिळाला तर पार्वती – ज्ञानेश्वर बाळासाहेब कदम यांना मिळाला आहे .या संगीत आखाडीमध्ये ६० पेक्षा अधिक रामायण महाभारतातील दृश्य साकारली जातात , यात १५० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी होतात सूत्रधार , गणपती , रामायण , महाभारत , विष्णु पुराण , वेताळ , एकादशी , रक्तादेवी , यासारखी अनेक दृश्य पात्रे सादर केली जातात . सत्यवान सावित्री , लिंगेश्वर महादेव , खंडोबा , वाघ्यामुरळी , शेंडे नक्षत्र आदीची वैशिट्य पुर्ण माडणी केलेली आढळून येते या पात्रांचे सादरीकरण सायं ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत चालु असते सकाळच्या प्रहरी पाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी ऋतुमान उकलविधी हा विशेष कार्यक्रम संपन्न होतो , पिक पाणी तसेच कोणत्या पिकाला चांगले दिवस ऋतुमानानुसार हेही सांगितले जाते . जंगी हंगाम्याने या यात्रेची सांगता होते . या हंगाम्यासाठी महाराष्ट्रातून पहिलवान हजर होतात . या वर्षी हंगाम्यातील कुस्ती हि १५१५१ रुपयांची आहे .अंतिम प्रथम कुस्ती कुमारी प्रतीक्षा एकनाथ कानवडे (रायगड पोलीस ) १५१५१ रुपये द्वितीय कै .रीनाताई राजेंद्र हाडवळे यांचे स्मरणार्थ १११५१ रुपये ,तृतीय कै.सौ.शांताबाई नामदेव शेलार यांचे स्मरणार्थ ७१५१ रुपये ,चतुर्थ कै.कारभारी रावजी हाडवळे यांचे स्मरणार्थ ५१५१ रुपये अशी कुस्तीसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तरी या हंगाम्यास पहिलवानानी मोठया संख्येने हजर राहण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आहे. गावातील व्यक्ती नोकरी निमित्त गावाबाहेर असतानाही गावाच्या बांधिलकीशी प्रामाणिक राहुन पुणे , मुंबई , नाशिक , औरंगाबाद या शहरामध्ये व परदेशातही गेलेल्या तरुणाचे पाय या यात्रे वेळी गावाकडे ओढले जातात . आई वडील , भाऊ बहिण , वडीलधारी मंडळीशी सवांद साधता येतो . हेच तर या यात्रेचे वैशिट्य आहे . त्यांचे प्रेम , आशीर्वाद या निमित्ताने मिळविता येतात यात्रे निमित्ताने प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील काही भाग भगवान लिंगेश्वरांच्या चरणी लीन होऊन देणगी रूपाने देतात म्हणून तर देवस्थानची विकासाकडे वाटचाल चालू आहे .
अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरणजी लहामटे साहेब यांच्या माध्यमातुन “ भगवान लिंगेश्वर सांस्कृतिक भवन’’ साठी ७० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन पहिल्या टप्यातील काम प्रगती पथावर आहे . तसेच यावर्षी महाराष्ट्र शासनाचा “ ब ‘’वर्ग दर्जा प्राप्त झाला त्यामाध्यमातून ५ कोटी रुपयांचा निधी हि लवकरच प्राप्त होऊन देवस्थान एका वेगळ्या उंची पर्यंत विकास कामाच्या मध्यमातून पोहोचणार आहे .
भगवान लिंगेश्वरांच्या पटांगणात पेविंग ब्लॉक बसविण्याचे काम पुर्ण झाले असुन या देवस्थानने अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत . त्यामध्ये प्रामुख्याने सभागृह धर्म शाळेचा जिर्णोधार , लिंगेश्वर मार्केट , चिरेबंदी , दीपमाळ , अशी विविध विकास कामे केली आहेत . त्याचप्रमाणे श्री लिंगेश्वर मार्केटचा विस्तार करून नवीन शॉपिंग संकुल बांधण्यात आले आहे .याशिवाय वर्षभरात सण उत्सव मोठ्या प्रमाणात भगवान लिंगेश्वर देवस्थानच्या मार्फत साजरे केले जातात .ह्या यात्रा उत्सवासाठी अकोले व संगमनेर तालुक्यातील नामवंत रील स्टार यात्रेचे कव्हरेज घेण्यासाठी हजर राहणार आहे .
हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट ,ग्रामपंचायत कार्यालय ,लिंगदेव ,लिंगेश्वर आदर्श विद्यालय साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचालित न्यु हायस्कुल व आर आर कानवडे ज्युनिअर कॉलेज लिंगदेव ,तसेच ग्रामस्थ एकीने व एक दिलाने काम करताना आढळून येतात . देवस्थानचे अध्यक्ष दत्तु भाऊ फापाळे ,उपाध्यक्ष दत्तु कानवडे,विश्वस्त सदाशिव कानवडे ,सुरेश कानवडे ,सुदाम हांडे ,भाऊसाहेब पवार,रामकृष्ण कानवडे ,पी. वाय जाधव सर ,उत्तम हाडवळे,एकनाथ कोरडे ,एकनाथ कानवडे ,दत्तु फापाळे ,सुनील शहा , बन्शी कानवडे ,निवृत्ती आंबरे, हरिभाऊ फापाळे ,भाऊसाहेब हाडवळे ,कैलास फापाळे ,बाळशीराम आढाव ,सरपंच अमित घोमल , उपसरपंच प्रमिला कानवडे ,कामगार पोलीस पाटील मंगल पवार, ,मा प.स सदस्य जयवंत आढाव,माजी सरपंच प्रभाकर फापाळे ,सखाहारी फापाळे , बाळासाहेब कानवडे , निवृत्ती कानवडे, भाऊसाहेब पवार , सुभाष होलगीर, गणेश पवार , अरुण फापाळे , सुदाम कोरडे , सुभाष कानवडे , जानकीराम हाडवळे , नानासाहेब कदम , आंबरे सर , डॉ . भूषण कानवडे , अशोक फापाळे ,महेश फापाळे ,सोमनाथ पवार,सुनील कानवडे ,अनिल हांडे,संदीप कानवडे ,संदीप फापाळे ,भाऊसाहेब फापाळे ,राधाकिसन फापाळे,अंकुश फापाळे,महेश फापाळे,गणपत फापाळे,राधाकिसन फापाळे,उल्हास फापाळे, ऋषिकेश कानवडे,विक्रम पवार,डॉ सचिन हाडवळे ,प्रमोद जाधव ,धनंजय वाकचौरे ,डॉ अभिजित फापाळे ,इंजी जालिंदर कानवडे,इंजी अमोल फापाळे ,शरद पवार ,सुनील कानवडे ,अनिल फापाळे ,दयानंद फापाळे ,संकेत फापाळे , इंजी प्रताप कानवडे , अजित फापाळे, तान्हाजी पवार , अशोक घोमल , बाबाजी धुमाळ , राजेंद्र फापाळे , रोहिदास कानवडे , पोपट नाईकवाडी , पो कॉ राजेंद्र कानवडे , युवा उद्योजक भाऊसाहेब रोहिदास घोमल , अमोल फापाळे ,सोमनाथ कानवडे , भाऊसाहेब फापाळे , सुदाम फापाळे , प्रा . संजय फापाळे , प्रा .एकनाथ फापाळे , प्रा . अण्णा फापाळे , नानासाहेब फापाळे , पोपट हाडवळे , गोविंद कातोरे , चेतन आढाव , गोविंद कोरडे ,पोपट कोरडे, व पुणे ,नाशिक ,मुंबई , छत्रपती संभाजी नगर मित्र मंडळ व गावातील ग्रामस्तआदी परिश्रम घेत आहे.
