डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने मारुतीराव साळवे व रवींद्र देशमुख सन्मानित
अकोले प्रतिनिधी- छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा परिषद चे माजी समाज कल्याण सभापती मारुतीराव साळवे व अकोले तालुक्यातील कोतुळ येथील स्व.भाऊ दाजी पाटील देशमुख यांचे वारसदार रवींद्र भाऊसाहेब देशमुख यांना त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदाना बद्दल भारतभूषणसांस्कृतिक कला व नाट्य संस्था ठाणगाव या संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त भारत भूषण सांस्कृतिक कला व नाट्य संस्था ठाणगाव ता. सिन्नर जि. नासिक आयोजित छत्र पती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते, लोककलावंत, विविध क्षेत्रात योगदान असणारे मान्यवरांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री ना. माणिकराव कोकाटे खासदार राजाभाऊ वाजे, उदय भाऊ सांगळे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद समाजकल्याण माजी सभापती मारूतीराव साळवे यांना त्यांच्या जीवनात पुरोगामी शिव शाहू, फुले, आंबेडकरी, चळवळीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरी विचारांचा पाइक आणि भूमिहीन शेतकऱ्याचा लढा याचे नेतृत्व, शोषित पिढीत लोकांच्या न्याय हक्कासाठी अविरत लढा देऊन न्याय मिळून दिला. याकरिता श्री साळवे यांना या वर्षीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात आला.
दुसरे खरे पुरस्काराचे मानकरी अकोले तालुक्याचे आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय भाऊ दाजी पाटील देशमुख यांचे वारसदार रवींद्र देशमुख यांना देखील सन्मानित करण्यात आले. स्वर्गीय भाऊ दाजी पाटील देशमुख यांनी सर्व समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या स्पृश्य अस्पृश्य भेदभावाला छेद दिला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करून आपल्या मूळ गावी कोतूळ येथे डॉ बाबासाहेब यांची जंगी मिरवणूक काढून आपल्या घरी तथा देशमुख वाड्यावर बाबासाहेबांचा सत्कार केला. भोजनाचा पाहुणचार करून आपल्याच घरातील चोपाळ्यावर डॉ बाबासाहेबांना बसून झोका देत आपला आनंद मोठ्याप्रमाणात व्यक्त केला. असा आदर्श सर्व समाजासाठी स्वर्गीय भाऊ दाजी पाटील यांनी उभा केला. सर्व आंबेडकरी जनसमुदयासाठी ही खरी प्रेरणादायी घटना ठरली. याचाच आदर्श वारसा घेत रविंद्र देशमुख हे उच्च शिक्षित असून ग्रामीण भागात गोरगरीब जनतेच्या मुले यांना शिक्षण मिळावे याकरिता अग्रि कॉलेज, इंग्लिश मेडीयम स्कूल असे उभारून जनतेची सेवा अविरत करत आहेत आजही आपल्या पणजोबा यांच्या विचाराला आदर्श मानून आपली घोडदौड करत आहेत अशा या व्यक्तिमत्वाचा देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी सुप्रसिद्ध पुष्कराज थीयटर प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड , भीमसेन साळवे, विनायकराव आव्हाड, अजित मोमीन, रामनाथ मेंगाळ, दामू मेंगाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या पुरस्काराबद्दल दोघांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमासाठी कोतूळ गावाचे देशमुख परिवारातील मित्र परिवार, तसेच कोंभाळणे गावचे बाळासाहेब साबळे,शामराव साबळे, सुनील साबळे , राजुभाऊ साबळे, अशोकरव साबळे, बनसोडे, , सुमेध साळवे, तसेच महिला वर्ग उपस्थित होते.
