अगस्ति संस्थेचे 12 वी परीक्षेत घवघवीत यश
अकोले प्रतिनिधी ---
येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 12 वी च्या बोर्ड परीक्षेत कला व विज्ञान शाखेचा निकाल समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवत संस्थेची निकालाची परंपरा कायम राखली आहे.संस्थेच्या अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले येथील कला शाखेचा निकाल 82 टक्के लागला असून विद्यालयात गुणानुक्रमे प्रथम कडाळी संदीप शिवाजी 75 .17, द्वितीय दराडे शैलेंद्र पाटीलबा 49.67, तृतीय जाधव तुषार निवृत्ती 47.17 टक्के गुण प्राप्त केले.
तर संस्थेच्या सह्याद्री उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा निकाल 90 टक्के लागला असून विद्यालयात गुणानुक्रमे प्रथम कु वायळ प्रमिला मिनानाथ 75 % , द्वितीय कु गोंदके गायत्री रोहिदास 67.83 , तृतीय वायळ वैभव गोविंद 65.67 टक्के तसेच येथील विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून गुणानुक्रमे प्रथम कु मोताळे सृष्टी परशुराम 83.83, द्वितीय कु हासे स्वरा चंद्रशेखर 83%, तृतीय कु गीते स्नेहा अशोक 71.17% इतका लागल्याने आनंद व्यक्त होत आहे. संस्थेच्या अढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा निकाल 85.11 टक्के असून विद्यालयात गुणानुक्रमे प्रथम कु पारधी आरती हौशीराम 69 .17% , द्वितीय खडके संदीप कैलास 64.50%, तृतीय मधे उमेश युवराज 63.33% इतका लागला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांनी ग्रामीण भागातील बहुजनांची मुले -मुली अधिक शिक्षित व्हाव्यात म्हणून संस्थेच्या विद्यालयाची संख्यात्मक वाढ करण्याऐवजी गुणात्मक वाढ होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले व त्याच पार्श्वभूमीवर बाबांच्या तसेच कै दुर्गाबाई नाईकवाडी तथा आई यांनी संस्कारित केलेल्या आदर्शांवर सर्वच विद्यालयातील शिक्षक संस्था पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली हा वसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत.
वर्षभराचे उत्तम नियोजन , जादा तासिका , योग्य सराव , वैयक्तिक मार्गदर्शन , तज्ञ शिक्षक मार्गदर्शन आदी गोष्टींचे काटेकोरपणे पालन केल्यानेच हे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. बोर्ड परीक्षेतील निकालाबाबत सर्वच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे , मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या वतीने संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर , कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी यांचेकडून अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी धुमाळ , उपमुख्याध्यापक प्रकाश सोनवणे , पर्यवेक्षक संजय शिंदे , मंगेश खांबेकर , सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा विद्यालयाचे प्राचार्य सुनिता शेलार , पर्यवेक्षक तात्यासाहेब दौंड , अढळा विद्यालयाचे प्राचार्य सी एम सहाणे व त्या सर्व विद्यालयातील सर्व विषयांचे मार्गदर्शक शिक्षक यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.