मुंबई आझाद मैदान येथे दि.20 मे रोजी होणाऱ्या मांतग समाजाचे जन आक्रोश महा आंदोलन


अकोले प्रतिनिधी- मुंबई आझाद मैदान येथे दि.20 मे रोजी होणाऱ्या मांतग समाजाचे जन आक्रोश महा आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दलित मित्र प्रकाश साळवे यांनी केले.

  सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती पैकी मातंग समाज हा मागास असल्याचा निर्वाळा दिला असून राज्य सरकारने त्या अनुषंगाने आरक्षण लागू करण्यासाठी सूचना केल्या. त्यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांची समिती गठित करून अहवाल मागितला ,त्या अहवालात मातंग समाज नोकऱ्या आणि शिक्षणात राजकीय सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास दिसून आला त्या साठी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून जून 2025 पासून लागू करावे या मागणीसाठी 20 मे रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 5 लाख समाज बांधव जमणार आहेत.

त्या मोर्चात राज्यातील मातंग समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले असून अकोले तालुक्यातील मातंग समाजाने देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन दलीत मित्र प्रकाश साळवे यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post