आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177 व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
अकोले प्रतिनिधी- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या १७७ व्या पुण्यतिथी निमित्त आज 2 मे रोजी जनजाती कल्याण आश्रम अकोले या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, भाजप चे अकोले मंडल अध्यक्ष राहूल् देशमुख,रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, जेष्ठ पत्रकार अमोल वैद्य, माजी नगर सेवक सचिन शेटे,बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष राहूल ढोक ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बापू टेके,अनिकेत साळुंके,मॉडर्न हायस्कूलच्या सौ.संगिता कचरे मॅडम,राजू भांगरे, बाबासाहेब नाईकवाडी,राहूल जगताप,पत्रकार प्रविण देठे ऋषी जाधव, हर्षदीप डावरे,व्यवस्थापक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,राहुल देशमुख, बाळासाहेब वडजे,अमोल वैद्य आणि प्राचार्य संतोष कचरे यांनी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या क्रांतिकारी चळवळीला,त्यांनी अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याला उजाळा दिला. व देशपातळीवर तालुक्याचे नावलौकिक वाढविला,अशा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची पुण्यतिथी तालुका पातळीवर मोठया प्रमाणावर साजरी करण्यात यावी असे मत व्यक्त केले.त्यास उपस्थित सर्वांनी दुजोरा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्राचार्य संतोष कचरे यांनी केले.
