पत्नीच्या जाचाला कंटाळून लिपिक संदीप मंडलिकची आत्महत्या
अकोले प्रतिनिधी-पत्नीच्या जाचाला कंटाळून संदीप दिलीप मंडलिक या इसमाने गायांच्या गोठ्यात लाकडाला दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना अकोले शहरातील माळीझाप शिवारात घडली असुन याबाबत पत्नीवर अत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अकोले पोलिसांत दाखल करण्यात आला असुन पत्नीस अटक केली आहे.
या प्रकरणी अकोले पोलिसांत मयत संदीप यांचे वडील दिलीप उमाजी मंडलिक यांनी त्याची पत्नी रूपाली हिच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संदीप याची बहीण उज्वला हिच्या ही बाब लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा केला.त्यानंतर अकोले पोलिसांना कळविल्या नंतर पोलिस घटना स्थळी दाखल झाले . त्यांनी संदीपचा मृतदेह खाली काढला तेव्हा त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली त्यामध्ये " एवढे सर्व होऊन ही बायको सुधारली नाही त्यामुळे जीवन संपवत आहे . बैठक घेऊन काही उपयोग नाही कारण मला तिला सोडायचं नव्हत ती सुधारावी ही अपेक्षा " असा मजकूर लिहिलेला होता.यानंतर संदीप याचे वडील दिलीप उमाजी मंडलिक वय 63 यांनी संदीप याची पत्नी रुपाली हिच्या विरुद्ध तक्रार दिली असून संदीप याच्या मृत्यूस रूपाली ही कारणीभूत असल्याचा आरोप या तक्रारीत काण्यात आला असल्याने अकोले पोलिसांत गुरनं २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०८ प्रमाणे अत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
संदीप हा बुवासाहेब नवले पतसंस्थे मध्ये राजूर शाखेत लिपिक म्हणून सेवेत होता.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याच्या मागे एक मुलगा , वडील , आई असा परिवार आहे.
