मंत्री उदय सामंत यांनी घेतली शहिद जवान गायकर कुटुंबाची सांत्वनपर भेटशिवसेना परिवाराच्या वतीने गायकर कुटुंबियांना 5 लाखाची आर्थिक मदत



मंत्री उदय सामंत यांनी घेतली शहिद जवान गायकर कुटुंबाची सांत्वनपर भेट

शिवसेना परिवाराच्या वतीने गायकर कुटुंबियांना 5 लाखाची आर्थिक मदत 

अकोले प्रतिनिधी- 
जम्मू काश्मिर मध्ये दहशतवादी हल्ल्यात अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील वीर जवान संदीप गायकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, काल शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर ब्राम्हणवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
  राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांनी गायकर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली,शिवसेना परिवार हा वीर जवान शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कम उभा राहील,असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेच्या वतीने शहीद जवान संदीप गायकर यांच्या कुटुंबाला ५ लाखाची मदत देण्यात आली.
    या प्रसंगी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे , संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे , उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ ,तालुका प्रमुख सुशांत गजे,सहसचिव सुभाषराव येवले, अकोले शहराध्यक्ष सचिन शेटे, अकोले शहर कार्याध्यक्ष जावेद जहागिरदार,श्री कांताराम मेंगाळ, बाळासाहेब भोर,उपतालुकाप्रमुख गणेश पापळ,युवासेना जिल्हा प्रमुख श्री महेश देशमुख , विशाल गोंदके,वैभव गोंदके, सुभाष गायकर पाटील अक्षय आरोटे पोपट मेंगाळ या सहित आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post