वीर जवान संदीप गायकर यांना अकोलेत अभिवादन रोटरी क्लब व केमिस्ट,मेडिकल असोसिएशन चा पुढाकार


वीर जवान संदीप गायकर यांना अकोलेत अभिवादन 

रोटरी क्लब व केमिस्ट,मेडिकल असोसिएशन चा पुढाकार

अकोले (प्रतिनीधी)-अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील वीर जवान संदीप गायकर यांना सकाळी बस स्थानक अकोले येथे रोटरी क्लब सेन्ट्रल, अकोले तालुका केमिस्ट व मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी 
अमर रहे अमर रहे,वीर जवान संदीप गायकर अमर रहे,भारत माता की जय, वन्दे मातरम् च्या घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता..
यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर, माजी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, रोटरी क्लब चे पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दिपक महाराज देशमुख,रोटरी क्लबचे अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन आवारी, सचिन देशमुख, सुनील नवले, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र डावरे,सेक्रेटरी अमोल देशमुख,उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, सह सेक्रेटरी समीर सय्यद, गंगाराम करवर, रोहिदास जाधव, डॉक्टर देविदास नवले, डॉ.किरण पारधी, डॉ.प्रकाश वाकचौरे, डॉ. प्रतीक घोडके,भारत पिंगळे, सचिन आहेर, मयूर रासने,नवनाथ शेटे,दिनेश आहेर, विजय पावसे,माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सखाराम घनकुटे,सेक्रेटरी डॉ.जयसिंग कानवडे, ग्रामीण रुग्णालय अकोलेचे मेडिकल ऑफिसर डॉ.बाळासाहेब मेहेत्रे, केमिस्ट असो. अध्यक्ष राजेश धुमाळ, सेक्रेटरी महेश येवले, राजकुमार भळगट, रविंद्र कोटकर, रवी पूंडे, सुरेश आवारी,सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर, डॉक्टर अनुप्रिता शिंदे, डॉक्टर रमा कुलकर्णी, डॉ.सौ.पारधी,
राजेंद्र नाईकवाडी , शाहीर मुकुंदा भोर, अनिल कोळपकर, भाऊसाहेब चासकर, प्राचार्य सुनील चौधरी, भाऊसाहेब नाईकवाडी, प्रशांत चौधरी, दत्ता धुमाळ आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य, रोटरी क्लब अकोलेचे आजी-माजी पदाधिकारी,सदस्य, अकोले तालुका केमिस्ट व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांचे सह शहरातील व्यापारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले. यावेळी अकोले तालुका सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर, हभप दीपक महाराज देशमुख, सौ.सोनाली नाईकवाडी,डॉ.अनुप्रिता शिंदे,डॉ.रवी गोर्डे,प्रमोद मंडलिक आदींनी मनोगत व्यक्त करताना वीर जवान संदीप गायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख, सचिन देशमुख, सचिन आवारी,दिनेश नाईकवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post