बिरोबाच्या यात्रेत पेटलेल्या कठ्याचा थरार | कौंठवाडी येथे पेटले नवसाचे 78 कठे
अकोले प्रतिनिधी- गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवत आलेल्या बिरोबाच्या काठीचा गाभाऱ्यातील मूर्तीला स्पर्श झाला. घंटानाद झाला अन् नवसाचे कठे पेटवले गेले. कठे पेटताच मोकळ्या जागेत भक्तांचा हाई हाई या चित्कार आणि यानंतर सुरू झाला कठ्चाच्या यात्रेचा थरार. हजारो भाविकांच्या उपस्थितीत कठ्यांतून निधणाऱ्या त्या ज्वाळांनी किर्रर्र अंधाऱ्या रात्री सभोवतालचा आसमंतही उजाळून निधाला.
राजूर पासून जवळच असलेल्या अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील बिरोबाच्या यात्रेत रविवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या कठें बरोबर तब्बल 78नवसाचे कठे पेटले. आदिवासी समाज आपली धार्मिकता आणि श्रद्धा जपत गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार कौठवाडी येथे अक्षय तृतीयेच्या नंतर येणाऱ्या रविवारी बिरोबाची म्हणजेच कठेची यात्रा भरत असते. अकोले तालुक्यातील कोठवाडी येथील बिरोबाच्या यात्रेत रविवारी रात्री हजारी भाविकांच्या उपस्थितीत नवसाचे कठे पेटले.
इतिहास पाहता कठची संख्या आणि उपस्थितांची संख्या यात वाढ होताना दिसून येत आहे. रविवारी रात्री नऊ वाजता यातील पेटवलेला मानाचा कठा उचलला गेला आणि इतर धगधगते कठे हे भका डोक्यावर घेत मंदिराभोवती फेऱ्या मारण्यास सुरुवात झाली. आग ओकणाऱ्या प्रत्येक कठ्या मागे नवस फेडणारी एक व्यक्ती त्यात गोडेतेल ओतत होती. धगधगत्या करुपात औतलेले तेल या भक्तांच्या अंगा खांद्यावरून ओघळत होते, पण श्राध्दपोटी उचललेल्या या काठ्यांतून ओघळणान्या गरम तेलाची इजा आजपर्यंत कोणालाही झाली नसल्याचे गावकरी सांगतात.
सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाने उपस्थित भावीकांच्या डोळ्याचे पारणे फेडले बिरोबा ट्रस्ट अध्यक्ष दत्ता भोईर यात्रा समिती,कौठवाडी व साकीरवाडी ग्रामस्थ यांनी यात्रेचे नियोजन केले. तसेच चालू केल्यावर आमदार डॉ.किरण लहामटे यांनीही उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे मार्गदर्शनाखाली महिला पो. कॉ. वाडेकर पो. कॉ. उषा मुठे , पन्हाळे ,कोंडार आणि त्यांच्या सहकान्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे ही कठे ची यात्रा निर्विघ्नपणे संपन्न झाली.
काठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली घागर, कापलेला भाग या घागरीत आतील बाजूस उलटा करून ठेवतात, सादडा, और, जांभूळ असा पेटणाऱ्याा झाडांची धपलाटे घागरीत उभी भरतात. यात कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने आशगंध, चंदनाच्या रंगाने छान नक्षी काढतात. रानचाफ्याच्या रंगीत फुलांनी कठा सजवला जातो. सजवलेले हे कठे बिरोधाच्या मंदिरासमोर मांडतात.