जनजाती कल्याण आश्नम अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्ष पदी सेवा निवृत्त प्राचार्य संतोष कचरे यांची नियुक्ती


जनजाती कल्याण आश्नम अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्ष पदी सेवा निवृत्त प्राचार्य संतोष कचरे यांची नियुक्ती 

अकोले प्रतिनिधी-
जनजाती कल्याण आश्नम अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्ष पदी सेवा निवृत्त प्राचार्य संतोष कचरे यांची नियुक्ती करण्यात आली.

नाशिक येथे दि.६ जुलै रोजी झालेल्या जनजाती कल्याण आश्नम पश्चिम महाराष्ट्र राज्याचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. मधुकर आचार्य ,उपाध्यक्ष सौ.कविता राऊत,प्रांत सचिव शरद शेळके,सहसचिव संदिप साबळे व प्रांत संघटन मंत्री अनिल पाटील यांनी या निवडीचा निर्णय घेतला.


जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम ही संस्था जनजाती जनतेच्या कल्याणासाठी देशभर काम करते.अनेक प्रकारच्या योजना राबवून जनजाती समाज प्रगतशील होईल या साठी सतत प्रयत्नशील असते. सेवा निवृत्त प्नाचार्य संतोष कचरे हे अकोले तालुक्यातील पळसुंदे येथील रहिवासी असून
 हिंद सेवा मंडळ या नामांकीत शिक्षण संस्थेत त्यांनी बारा वर्ष प्राचार्य पदी काम केलेले आहे .जनजाती समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी गेली तीस वर्ष सामाजीक संघटनेच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम केले आहे . मसामाजीक व राजकीय काम याची सांगड घालत त्यांनी समाजसेवा केली आहे.आदिवासी समाजाचे देशातील नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.ते रोटरी क्लब अकोलेचे विद्यामान सदस्य आहेत. ते पाच वर्षापासून अहिल्यानगर जिल्हयाचे जनजाती कल्याण आश्रमाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी जनजाती समाजातील शिक्षण ,रुढी परंपरा,कुपोषण ,धर्मांतर इ. बाबींचा अभ्यास करून समाज जागृती करण्याचे त्यांचे काम चालू आहे. त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या कामाला गती येईल.ते अधिक चांगले काम करू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post