आदिवासी भागात आता शेळ्यांनाही रेनकोट...



आदिवासी भागात आता शेळ्यांनाही रेनकोट...

अकोले प्रतिनिधि -
अकोले तालुक्यातील आदिवासी पाट्यातील बहुसंख्य ठाकर समाजातील कुटुंब शेळीपालन हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात . तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी पट्ट्या असलेल्या अतिदुर्गम घाटघर , उडदावणे, पांजरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळी पालक आहेत .पावसाळ्यात प्रचंड थंडी आणि वारा मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर शेळ्या मरण पावतात. 

थंडी आणि पावसापासून बचाव होण्यासाठी शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्या धुवून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून बनवलेले रेनकोट प्रत्येक शेळीला बांधण्यात आलेले आहेत. हे अनोखी शक्कल येथील शेळी पालकांनी शोधली आहे . यामुळे शेळ्यांच्या शरीरावर केसांमध्ये पाणी न जाता निथळून ते खाली पडते . शेळ्यांचा जोरदार पाऊस व थंडी वाऱ्यापासून बचाव होतो. ही अनोखी शकल लढवणारे ठाकर समाजातील ही गरीब कुटुंब माणसांप्रमाणेच शेळ्यांनाही संरक्षण देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र रेनकोट घातलेल्या शेळ्यांचे कळप दिसत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असूनही शेळ्यांना चारा खाण्यासाठी जंगलात फिरवता येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post