कन्या विद्या मंदिर येथे दिंडी सोहळ्याचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद


 कन्या विद्या मंदिर येथे दिंडी सोहळ्याचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

अकोले प्रतिनिधी- येथील कन्या विद्या मंदिर अकोले येथे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्याचा सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. विद्यालयातील अनेक विद्यार्थी विठ्ठल ,रखुमाई व विविध संतांच्या वेशभूषेत आले होते. बाकी सर्वच विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत सामील झाले होते .

 विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचा महिमा गात नृत्य केले व फुगडी खेळून आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मध्ययुगीन काळातील संतांचा महिमा संतांची कामगिरी व त्यांचे समाजसेवेमध्ये असलेले योगदान समजावे या उद्देशाने आनंदवारी चे आयोजन केले होते. संपूर्ण विद्यालय भक्ती रसात रंगून गेले .

पालखीचे पूजन पालकांच्या हस्ते करून सिद्धेश्वर मंदिराकडे पालखीचे प्रस्थान झाले तेथून परत दिंडी विद्यालयामध्ये आली व विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना लापशी , मसालेभात प्रसादाचे आयोजन केले गेले. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिंडी करता शुभेच्छा दिल्या. उपक्रम यशस्वी होण्याकरता मुख्याध्यापिका जया पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post