रोटरी क्लब अकोले सेंट्रल ची नूतन कार्यकारिणी जाहीर-
अध्यक्ष पदी अमोल देशमुख,सचिव गंगाराम करवर,उपाध्यक्ष किरण गजे,सह सचिव पदी विजय पावसे तर खजिनदार पदी रोहिदास जाधव
अकोले(प्रतिनिधी)-रोटरी क्लब अकोले सेंट्रल ची सन २०२५-२६ या वर्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी माजी अमोल देशमुख,सचिव पदी गंगाराम करवर,उपाध्यक्षपदी किरण गजे, सह सचिव पदी विजय पावसे तर खजिनदार पदी रोहिदास जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळते अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.
रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी सामाजिक संस्था आहे. सात वर्षीपूर्वी अकोले येथे रोटरी क्लब ची स्थापना करण्यात आली.स्थापने नंतर अकोले तालुक्यात विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात आले .मागील वर्षी त्यामध्ये रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, व्याख्याने,वृक्षारोपण,राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार,व्होकेशनल अवॉर्ड,कृषी दिन, डॉक्टर्स डे, स्त्री जन्माचे स्वागत, काविळ रुग्णासाठी औषध वाटप,ऍनिमिया तपासणी,महा रोजगार मेळावा,करियर गाईडन्स, शाळेला संगणक वाटप,अगस्ति विद्यालय येथे रोटरी इन्ट्रॅक्ट क्लब ची स्थापना,विद्यालयाला शैक्षणिक सॉफ्टवेअर सह 43 इंची टीव्ही भेट, गंभीर आजारी रुग्णांना आर्थिक मदत,शालेय मुलींना सायकल वाटप,एकल महिलांना आटा चक्की वाटप,जि.प.प्रा.शाळेस संगणक भेट, केळुगन येथील मांगे परिवाराला गृहउपयोगी साहित्य मदत वआदींसह विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविले गेले.
यावर्षी देखील क्लबच्या माध्यमातून सर्व समावेशक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष अमोल देशमुख वयांनी सांगितले अमोल देशमुख हे अकोले ,संगमनेर येथील संदेश चष्माघरचे संचालक असून त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले असुन त्यांनी अकोले येथे त्यांचा स्वतःचा गाळा रोटरी आय केअर सेंटर उभारण्यासाठी मोफत दिला आहे.या सेंटर मार्फत नागरिकांचे डोळे तपासले जाणार आहेत.आहेत.त्यांनी रोटरी क्लब चे सेक्रेटरी पद सांभाळले आहे.
सचिव गंगाराम करवर हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,राजूर येथे निरीक्षक पदावर कार्यरत असून रोटरी क्लब चे ते माजी खजिनदार होते.
उपाध्यक्ष किरण गजे हे अर्थवेद पतसंस्था अकोलेचे कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असून ते वाशेरे गावचे सरपंच राहिलेले आहेत.व्यावसायिक आहेत.सहसचिव विजय पावसे हे मिलन मोबाईल शॉपीचे संचालक असून ते सामाजिक कार्यात सतत कार्यरत असतात.खजिनदार रोहिदास जाधव हे राजबक्षी वडा चे संचालक आहेत.बुवासाहेब नवले मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी चे विद्यमान संचालक आहेत त्यांनी या पूर्वी रोटरी क्लब च्या खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळली असून पुन्हा या वर्षी त्यांना खजिनदार पदाची जबाबदारी दिली आहे.
सन २०२५-२६ या वर्षा साठी विविध योजनांची, कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील संचालक मंडळाची निवड करण्यात आली .
त्यामध्ये सचिन शेटे- डायरेक्टर क्लब एडमिनीस्ट्रेशन,
सचिन देशमुख- डायरेक्टर क्लब लर्निंग फॅसिलिएटर,हभप दीपक महाराज देशमुख- पब्लिक इमेज, प्रा.विद्याचंद्र सातपुते- आयपीपी व बुलेटिन एडिटर
प्रा.डॉ.संजय ताकटे- डायरेक्टर,फेलोशिप
सुनील नवले व डॉ.संतोष तिकांडे- टी आर एफ डायरेक्टर
सचिन आवारी- सार्जंट अँड आर्म्स,
वकील बाळासाहेब वैद्य- डायरेक्टर कम्युनिटी,निलेश देशमुख- डायरेक्टर व्होकेशनल सर्व्हिस,
मयूर रासने- डायरेक्टर युथ सर्व्हिस,सुधीर फरगडे- डायरेक्टर आय.टी. मीडिया,संदीप मालुंजकर- डायरेक्टर इन्व्हायरमेन्ट,
अनिल देशमुख- डायरेक्टर
ह्युमॅनीटी डेव्हलपमेंट,
अरुण सावंत- डायरेक्टर मेंबर्स डेव्हलपमेंट,डॉ.मनोज सदाफुले- डायरेक्टर, आर आय इंफासीस,
डॉ.जयसिंग कानवडे- डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट लोकल,
डॉ.प्रकाश वाकचौरे- डिस्ट्रिक्ट इंफासीस,
प्रा.संतोष कचरे- डायरेक्टर लिटरसी
दिनेश नाईकवाडी- इव्हेंट मॅनेजमेंट कल्चरल
नूतन पदाधिकारी व संचालक मंडळ व सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.