डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान, रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या पदाधिकारी यांचा रविवारी पदग्रहण सोहळा
अकोले (प्रतिनिधी) रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या नूतन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मातोश्री लॉन्स, के. जी. रोड ,अकोले येथे ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे नूतन अध्यक्ष अमोल देशमुख, सचिव गंगाराम करवर, उपाध्यक्ष किरण गजे, सह सचिव विजय पावसे व खजिनदार रोहिदास जाधव यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.किरण लहामटे ,रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे असिस्टंट गव्हर्नर आर्किटेक रविकिरण डाके व अमोल वैद्य हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते,उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, सह सेक्रेटरी समीर सय्यद,खजिनदार संदीप मोरे आदिसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
