अभिनव शिक्षण संस्थेत ७९ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा



 अभिनव शिक्षण संस्थेत ७९ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा


अकोले (प्रतिनिधी) -हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनव शिक्षण संस्थेमध्ये ७९ वा  'स्वातंत्र्य दिन' मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे गोकुळाष्टमीचा उत्सवही संपन्न झाला. त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. भारतीय ध्वजाला मानवंदना देत वसुंधरा अकॅडेमीच्या गीतमंचाने राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत सादर केले. मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल व वसुंधरा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली शितबद्ध परेड संचालन केले. याचबरोबर अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, वसुंधरा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत, समूहनृत्ये,योगा प्रात्यक्षिके, संगीत कवायत,लेझीम प्रात्यक्षिके सादर केली.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गोकुळाष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्ण पूजन करण्यात आले.अभिनवच्या गोविंदांनी दहीहंडी उत्सव उत्कृष्टरित्या सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

 भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले, पण स्वातंत्र्य मिळणे  एवढ्यापुरतेच या दिवसाचे महत्त्व मर्यादित नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांचे बलिदान स्मरणात ठेवून,स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करून आपापसातील बंधुभाव जपावा. राष्ट्रातील एकात्मता वाढीस लागावी.विद्यार्थी आणि तरूणांनी उच्च शिक्षित होऊन देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, निर्व्यसनी जीवन जगत व्यसनाधीनता कशी थांबवता येईल याचाही विचार तरूणांनी करायला हवा. देशाच्या आत्मनिर्भरतेबद्दलची, स्वातंत्र्याबद्दलची आणि लोकशाहीबद्दलची आपली एक बांधिलकी आहे.असे प्रतिपादन प्रमुख अतिथी  मधुकरराव नवले यांनी केले व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या व गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. 

 २०२४-२५ मध्ये इयत्ता दहावीत मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी अनन्या भांगरे हिने ९२.२०% गुण मिळविल्याबद्दल तिला राघोजी भांगरे गुणगौरव योजनेअंतर्गत ३५००० रुपयांचे पारितोषिक जाहीर झाल्याने अनन्या व तिच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बालविवाह प्रतिबंधक उपाय म्हणून बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मधुकरराव नवले, कोषाध्यक्ष तथा कॅम्पस डायरेक्टर मा. प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, सेक्रेटरी मा. विक्रम नवले, सहसचिव तथा प्राचार्या अल्फोन्सा.डी, उपप्राचार्या राधिका नवले, प्राचार्या कुसुम वाकचौरे, सर्व विभाग प्रमुख त्याचबरोबर अभिनव शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व  विदयार्थी  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिनव शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभाग, कला विभाग , सांस्कृतिक विभाग , आय.टी. विभाग यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत मंडलिक, इरफान सय्यद सोनिया कोल्हे, ऋतुजा वऱ्हाडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post