नरेश राऊत फौंडेशन कडून कन्या विद्या मंदिरामध्ये सॅनिटरी नॅपकिन वाटप | वर्षभर सॅनिटरी नॅपकिन पुरविणार
अकोले प्रतिनिधी-कन्या विद्या मंदिर अकोले येथे नरेश राऊत फाउंडेशन,केलवड,ता.राहता, जि. अहिल्यानगर यांचे वतीने इयत्ता आठवी ते दहावी च्या 180 विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. वर्षभर प्रत्येक महिन्याला सॅनिटरी नॅपकिन दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेश फाउंडेशनचे सचिव लक्ष्मण गोर्डे होते.
तर कार्यक्रमासाठी नरेश फाउंडेशनचे संचालक विलास महाले लेखाधिकारी अंकुश बत्तासे , प्रोजेक्ट डायरेक्टर नवनाथ राजपूत व मधुकरराव पिचड माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तेलोरे सर उपस्थित होते. श्री विलास महाले यांनी नरेश फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर श्री गोर्डे यांनी विद्यालयास मदत करण्याचे आश्वासन दिले . ग्रामीण भागातील या स्तुत्य उपक्रमासाठी नरेश फाउंडेशनचे खूप खूप अभिनंदन व आभार .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जया पोखरकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. आरोटे मॅडम यांनी केले तर आभार सौ नवले मॅडम यांनी मानले .