राजुर येथील शिवदत्त हिंदराज मित्र मंडळाने साकारली भव्य सप्तशृंग निवासिनी देवी देखावा



 राजुर येथील शिवदत्त हिंदराज मित्र मंडळाने साकारली भव्य सप्तशृंग निवासिनी देवी  देखावा


अकोले प्रतिनिधी-


राजुर येथील शिवदत्त हिंदराज मित्र मंडळाने साकारलेला सप्तश्रुंगी देवीचा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.  या मंडळाचे वैशिष्ट्य असे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे   टाकाऊ वस्तू पासून तयार केले जातात. या वर्षीही मंडळाने ८ फूट उंच १८ भुजा असलेली भव्य सप्तश्रुंगी देवीची मूर्ती संवर्धनापूर्वीच स्वरूप साकारलेले आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व अभिनव शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले कला शिक्षक यांनी स्वतः ही मुर्त बनवलेली असून सप्तश्रुंगी मातेची हुबेहूब प्रतिकृती बनवलेली आहे. 

    देखावा बघण्यासाठी राजुर व पंचक्रोशीतील भाविक नागरिक गर्दी करताना दिसत आहे. मंडळाला यावर्षी सोळा वर्षे पूर्ण होत आहे या अगोदरही मंडळाने भंडारदरा, केदारनाथ, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, काश्मीर, शेषनाग, इंद्र दरबार, प्रति जेजुरी, सितागुफा, गरुडराज असे अनेक प्रकारचे देखावे साकारलेले आहेत.

 मुर्त बनविण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागला असून वणी येथील आई सप्तश्रुंगी देवीच जे शेंदूर काढण्या अगोदरच रूप भाविकांच्या मनात बसले होते तेच रूप पुन्हा भाविकांना बघता यावे यासाठी ही मुर्त बनविण्यात आली असल्याचं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आशिष हंगेकर यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष पार्श्व मेहता, कार्याध्यक्ष संतोष जगदाळे, सचिव हिरेण रुपडा, खजिनदार मनोज हंगेकर, व्यवस्थापक धवल मेहता व ऋषिकेश हंगेकर, हिंद लहामटे, विक्रम जगदाळे उपस्थित होते.

 सामाजिक संदेश किंवा एखादी कलाकृती, देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम यातून मिळणारा आनंद काही वेगळाच व भव्य दिव्य असतो.जगदंबेच जुन्या रुपातील हे स्वरूप बघण्यासाठी  सर्वांनी यावे व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वेश जगदाळे, वीर मेहता, सम्यक मेहता, हर्षित मेहता, संदेश चोथवे, नैतिक शहा,पार्थ कानकाटे, आदित्य जगदाळे, अवधूत चव्हाण,अक्षय पंडित, विनायक सूर्यवंशी,विशाल बांबळे, लोचन पारधी, गणेश पारधी, दर्शन जगदाळे,श्रेयश बोऱ्हाडे ,निखलेश शिंदे ,ऋषी बेळे, आदी सदस्यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

Previous Post Next Post