रविवार च्या शाळेतील 26 मुलांना रोटरी क्लब च्या माध्यमातून संदेश चष्माघर यांचे कडून मोफत चष्मे वाटप
अकोले प्रतिनिधी- श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने ज्या मुलांना आई नाही,काहींना वडील नाही तर काहींना दोन्हीही नाही अशा मुलांसाठी श्रीनिवास रेणूकदास यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी ' रविवारची शाळा ' हा उपक्रम राबविला जातो.या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांचे आणि पालकांचे रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने मोफत डोळे तपासणी करण्यात आली.व ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे अशा 26 मुलांना रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या माध्यमातून अध्यक्ष अमोल देशमुख यांनी त्यांच्या संदेश चष्माघर ' या फर्म मार्फ़त मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
सर्वोदय च्या वस्तीगृहामधील सभागृहात रविवार ची शाळा भरविण्यात येते.यावेळी सारेगमप ची विजेती गायिका ज्ञानेश्वरी घाडगे,गणेशराव घाडगे,सौ राधा घाडगे,अमित पगारे, हभप विवेक महाराज केदार,जनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन भाऊ पाटील नवले,अर्थवेद पतसंसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा.बी. एम .महाले, बुवासाहेब नवले मल्टिस्टेट चे चेअरमन तथा अगस्ति कारखान्याचे चे संचालक विक्रम नवले, संटूआई देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष तथा उद्योजक डी. के.गोर्डे, रोटरी क्लब चे अध्यक्ष अमोल देशमुख, माजी अध्यक्ष तथा माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,मनोज गायकवाड, अमोल पवार,आकाश भालेराव, आदीसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते चष्मे मुलांना वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना शालेय गणवेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.सारेगमप विजेती गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिने आपल्या सुरेल आवाजात गाणे म्हणून सर्वांचे मने जिंकली.तसेच उपस्थित मान्यवरांनी या रविवारच्या शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करीत रोटरी क्लब च्या माध्यमातून केलेल्या चष्मा वाटपाचे कौतुकही करण्यात आले.सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीनिवास रेणूकादास यांनी केले तर आभार मनोज गायकवाड यांनी मानले.