माळीझाप येथे 78 नागरीकांनी घेतला डोळे तपासणीचा लाभ | रोटरी क्लब अकोले सेंट्रल चा उपक्रम
अकोले प्रतिनिधी- रोटरी क्लब अकोले सेंट्रल व रोटरी दर्शन आय केअर हॉस्पिट,संगमनेर आणि माळीझाप ग्रामस्थांच्या वतीने अंधमुक्त गाव अभियानांतर्गत माळीझाप येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचा लाभ 78 नागरिकांनी घेतला असून त्या पैकी 9 नागरिकांना ऑपरेशन चा सल्ला देण्यात आला असून त्या पैकी 7 नागरिकांना ऑपरेशन साठी नेण्यात आले.
माजी नगरसेवक प्रमोद मंडलीक व भाजपचे तालुका सरचिटणीस मच्छीन्द्र मंडलिक यांच्या पुढाकाराने हे शिबीर यशस्वी झाले आहे. यावेळी रोटरी दर्शन आय केअर हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित शिंदे,शिबिर सहाय्यक संदीप घुले,अमोल गुंजाळ, सिकंदर पठाण, रोटरी क्लब चे अध्यक्ष अमोल देशमुख, माजी अध्यक्ष अमोल वैद्य, विद्याचंद्र सातपुते, सचिन देशमुख, सचिन आवारी, सेक्रेटरी गंगाराम करवर,माजी उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.