भर पावसात आदिवासी महिलांचा दारूविरुद्ध एल्गार



भर पावसात आदिवासी महिलांचा दारूविरुद्ध एल्गार

अकोले प्रतिनिधी-

आज भर पावसात  आदिवासी भागातील नागरिकांनी एकत्र येऊन  वारंघुशी फाट्यावर  रास्ता रोको आंदोलन करून अवैध दारू बंद व्हावी याविरुद्ध एल्गार पुकारला. अनेक दिवस पोलिसांना निवेदन देऊनही  दारू थांबत नसल्याने शेवटी संतापून भर पावसात आदिवासी भागातील महिला, सरपंच, कार्यकर्ते, नागरिक यांनी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले..रविवार असल्याने पर्यटकांची सर्व वाहतूक बंद झाली.




 विविध गावातील सरपंच उपसरपंच  यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पोलीस व उत्पादन शुल्क अधिकारी यांनी या गावातील अवैध दारू थांबवण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतरच रास्ता रोको थांबवण्यात आला.  दारूबंदी आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी व राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष वसंत    मनकर यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

याप्रसंगी आजूबाजूच्या गावातील अनेक महिलांनी दारूमुळे होणारे त्रास, घरातील हिंसाचार व दारूमुळे त्या परिसरात तरुणांचे झालेले मृत्यू याबाबत आपली करुण कहाणी कथन केली.  यावेळी पोलीस उत्पादन शुल्क यांच्या समोर हेरंब कुलकर्णी यांनी आंदोलनाच्या मागण्या मांडल्या. 

 वारंघुशी व आजूबाजूच्या ज्या ज्या गावात अवैध दारू विकले जाते.. तेथील विक्री त्वरित बंद व्हावी .आजपर्यंत जितके गुन्हे या विक्रेत्यांवर दाखल झाले आहेत ते सर्व गुन्हे एकत्र करून त्यांच्यावर तडीपारची कारवाई व्हावी व त्यांच्या उताऱ्यावर दंड बसवला जावा. ज्या बीट अंमलदार कडे ही गावे आहेत त्या बीड अंमलदार वर कारवाई करून त्यांची बदली केली जावी शेंडी भंडारदरा येथील ज्या परवानाधारक दुकानातून ही दारू येते त्या दुकानाचे ऑडिट करून ते दुकान सील करण्यात यावे.. त्याचप्रमाणे राजूर हे दारूबंदीचे गाव असल्याने व आदिवासी गावांचे मुख्य केंद्र असल्याने तिथे पोलीस निरीक्षक हे स्वतंत्र पद निर्माण करण्यात यावे .


यावेळी बोलताना ॲड वसंतराव मनकर यांनी श्रीमंतांची दारू व गरिबांची दारू यात आम्ही गरिबांच्या दारू विरोधात संघर्ष करतो आहोत कारण गरिबांची दारू गरिबांचे संसार उध्वस्त करते असे सांगून त्यांनी केवळ पंटर केसेस न करता दारू विकणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी आग्रही मागणी केली..

वारंघुशी च्या सरपंच सरपंच फसाबाई बांडे व उपसरपंच समीर मुठे  यांनी जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नये अन्यथा गावागावांतील लोक अवैध दारू उद्ध्वस्त करतील असा इशारा दिला. यावेळी उत्पादन शुल्क अधिकारी सहस्त्रबुद्धे व पोलिस उपनिरीक्षक दीपक सरोदे यांनी या गावांमधील अवैध दारू बंद होईल असे लेखी आश्वासन दिले

 प्रकाश कोरडे सदस्य, विलास कडाळी सदस्य, कमल घाणे सदस्य, दिपक भागडे, अनंत घाणे, तसेच गावातील महिला ग्रामस्थ तरुण मंडळी, आणि रंधा गावचे सरपंच सुंदरलाल भोईर, जहागीरदार वाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे, पेंडशेत गावचे सरपंच सोमनाथ पदमेरे, चिंचोडी गावच्या सरपंच कविता मधे आणि  सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते

Post a Comment

Previous Post Next Post