आनंदगडावर सरस्वतीबरोबर लक्ष्मी पण नांदेल-नानजीभाई ठक्कर ठाणावाला
अर्थानंद महिला पतसंस्थेचा वीरगाव येथे शुभारंभ
अकोले ( प्रतिनिधी): आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या रूपाने वीरगाव येथे शैक्षणिक क्रांती झाली असून येथे सरस्वती चे वास्तव्य आहे. अर्थानंद पतसंस्थेच्या माध्यमातून सरस्वतीबरोबर आता लक्ष्मी सुद्धा आनंदगडावर नांदणार आहे असे प्रतिपादन थोर समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी केले.
आनंदगड शैक्षणिक संकुलातील नूतन अर्थानंद महिला पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते याप्रसंगी व्यासपीठावर माळशेज पतसंस्थेचे संस्थापक ह भ प चंद्रकांत महाराज डुंबरे, संस्थेचे सचिव डॉक्टर अनिल रहाणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यसरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, पतसंस्थेच्या चेअरमन गीता राहणे, व्हा.चेअरमन सुप्रिया वाकचौरे, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक विजय राहणे, मदनराव आंबरे , अमृतसागर दूध संघाचे संचालक रामदास आंबरे मॅनेजर दादाभाऊ सावंत राजाराम कुमकर, अशोकराव उगले ,अरुण शेळके, श्रीकांत सहाणे , जनार्दन आहेर जयवंत थोरात, सुनील वाकचौरे, अनिल आंबरे, शांताराम दातीर, संदीप आंबरे ,सुनील आहेर, अनिल डोळस,निलेश वाकचौरे संचालिका दिव्या वाकचौरे, मंजुश्री रहाणे, अक्षता रहाणे, साक्षी रहाणे, प्रगती वाकचौरे ,सविता पवार,अर्चना कराड, पल्लवी फलके सीमा आंबरे ,तृप्ती डोळस, प्राचार्य किरण चौधरी, प्राचार्य मिलिंद सुर्वे, समन्वयक प्रा.विद्याचंद्र सातपुते, नानासाहेब वाकचौरे, प्रज्ञा गायकवाड श्री पांडे श्री पुराणिक, रवींद्र आंबरे,धनंजय भालेराव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नानाजी भाई पुढे म्हणाले कीआपल्या या नवीन बँकेत भरपूर पैसे येतील, लोक विश्वासावर पैसे ठेवतात , या शैक्षणीक परिसरात कोणताही विश्वासघात होणार नाही असे हे पवित्र ठिकाण आहे. विद्यार्थी उज्ज्वल भारताची भावी पिढी आहे,तुम्ही पण शाळेचे व आईवडिलांचे नाव मोठे करा,समाजासाठी काही तरी करा असे विद्यार्थ्याना उद्देशून बोलले. नवरात्र चालू आहे व या पर्वावर नवीन महिला पतसंस्था सुरु होत आहे हा नारी शक्तीचा फार मोठा सन्मान आहे, असेही त्यांनी म्हटले.
ह भ प चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी माळशेज पतसंस्था नेहमी या अर्थानंद पतसंस्थेला मार्गदर्शन व सहकार्य करील अशी भावना व्यक्त केली.संस्थेचे कर्मचारी, परिसरातील नागरिक व पालकांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी चांगली संस्था सुरू झाली असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. डॉ.विश्वासराव आरोटे यांनी शेठ नानजीभाई यांचा परिचय व संस्थेची जडणघडण विषद करताना आपण या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार असल्याचे नमूद केले व नवीन पतसंस्थेसाठी शेठ नानजीभाई व डुंबरे महाराज नेहमीच ठेवी देऊन सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्तविक डॉ. अनिल रहाणे यांनी केले. स्वागत शिवराज वाकचौरे,अक्षय रहाणे, दिनेश वाकचौरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. संदीप थोरात यांनी तर देविदास चारोडे यांनी आभार मानले.याप्रसंगी आ आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज,धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीयम स्कुल,मातोश्री राधा कॉलेज फार्मसी महाविद्यालयातील विभाग प्रमुख,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.