आर्थिक अडचणी असल्या तरी अगस्ती कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू दिला जाणार नाही : सीताराम पाटील गायकर

 



आर्थिक अडचणी असल्या तरी  अगस्ती कारखाना  कोणत्याही परिस्थितीत बंद पडू दिला जाणार नाही : सीताराम पाटील गायकर

अकोले( प्रतिनीधी) -- आर्थिक अडचणी असल्या तरी  अगस्ती कारखाना  कोणत्याही परिस्थितीत बंद पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली.यावेळी अध्यक्ष स्थानाहून  गायकर बोलत होते.

यावेळी जि.प.अर्थ व बांधकाम समितीचे माजी  सभापती कैलासराव वाकचाैरे, जनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊपाटील नवले,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चाैधरी, कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, ज्येष्ठ संचालक पर्बतराव नाईकवाडी, अशोकराव देशमुख, विकास शेटे,मच्छिंद्र धुमाळ,विक्रम नवले,अशोक आरोटे,प्रदिप हासे, संदीपराव शेटे,सुधीर शेळके,रामनाथ वाकचाैरे, कैलासराव शेळके,पाटिलबुवा सावंत,मनोज देशमुख,डॅा.संदिप कडलग,राजेंद्र डावरे आदि मान्यवर  हेही सभास्थळी उप स्थित होते.




   यावेळी पुढे बोलताना श्री गायकर म्हणाले कि,मागील हंगाम १२४ दिवस चालला राज्यात उस कमी असतानाही अगस्तीने ३५९६०० लाख मे टन गाळप केले.आर्थिक अडचणीतुन जाताना चालु हंगाम सुरु करावयाचा आहे.त्यासाठी अजूनही कर्जाची गरज आहे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहे तेही उपलब्ध होईल दिपावलीला शेतकऱ्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे.आसवणी प्रकल्प पूर्णतः निल झाला आहे.खुप त्रास, कष्ट या तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वी काढलेला आहे त्यामुळे जरी कर्ज वाढले तरी हा अगस्ती बंद पडू नये हा आमचा प्रयत्न आहे आज पर्यत विरोधकांसह सर्वानी अगस्ती बंद पडू नये म्हणून सहकार्य केले आहे  व यापुढेही करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्षेत्रात १९७००० मे.टन व बाहेरचा मिळून एकुण ३,५९,६०० मे.टन उसाचे गाळप मागील हंगामात आपण केले आहे .मॅालेशिस व इथेनॅाल निर्मिती केली इतर उत्पादनातुन उत्पन्न मिळवले .एफ.आर.पी २६८६ असताना उत्पादक शेतकऱ्यांना २७०० रूपयांनी पेमेंट केले. खुप टंचाई असताना १४२ कोटी रूपये कर्ज उपलब्ध करुन शेतकऱ्यांचे पेमेंट दिले.आज ३३७ कोटीचे कर्ज अगस्ती कारखान्यावर आहे.जरी कर्ज वाढते आहे तरी हा कारखाना बंद होउ नये हा आमचा प्रयत्न आहे.सगळे यासाठी प्रयत्न करत आहे .सगळ्यांनी सहकार्य केले यापुढे करतील अशी अपेक्षा गायकर व्यक्त केली.

यावेळी मा.आ.वैभवराव पिचड म्हणाले कि, केद्र सरकारकडून ९४ कोटी रूपयांचे पॅकेज मिळावे म्हणून स्वर्गीय मधुकरराव पिचड  यांनी कोणतेही राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी,तालुक्याचे कामधेनुसाठी  शिफारस दिली होती.आज अहवाल वाचन करताना ज्या केद्र व राज्य सरकारमुळे ९४ कोटीचे पॅकेज मिळाले त्या सरकारचे केद्रीय सहकार मंत्री ना.अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे याचा नामोल्लेख ही केला नाही याची खंत वाटते अहवालातील चूक प्रशासनातील विभागाची चुक आहे.अहवाल छापताना प्रुफ रिडिंगला दिले जाते.अधिकारी यांनी चेक केले असेल. अधिकारी यांनी चुकीचे दिले असेल तर कारवाई करावी आणि जर अधिकारी यांना बरोबर दिले असेल छापणा-याची चूक असेल तर त्याचे बील देवु नये,वर्षभरात संचालक मंडळाकडून आर्थिक बचतीसाठी काय पावले उचलले, याची माहिती आजच्या सभेत दिली पाहिजे होती.

आमचे वक्तव्यातुन वेगळ्या चर्चा होऊन अगस्तीला गालबोट लागु नये म्हणून स्व.मधुकरराव पिचड यांनी आमच्यातुन  फक्त प्रकाश नवले यांना गेली तीन वर्षे वार्षिक सभेत पाठवले . येत्या काळात कारखान्याचे गाळपात बचतीचे मार्ग अवलंबले पहिजे, खर्चात पैसे वाचवता येईल,उत्पादकांना भाव कसा जास्त देता येईल असा मायक्रो प्लॅन केला पाहिजे.कारखान्याचे अडचणीत कधीही आमची गरज भासेल त्यावेळी आम्हाला आवाज द्या, हि भाग्यलक्ष्मी वाचवण्यासाठी आम्ही सोबत उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे म्हणाले कि,प्रत्येकाची भावना आहे कि, हि कामधेनु टिकली पाहिजे. मागच्या वर्षी केलेल्या सुचनाचे पालन केले नाही म्हणून आज आम्ही मिटिंगला व्यासपीठावर न बसता खाली सभासदामध्ये बसलो आहे.

वार्षिक सभेत ना.अमित शहा दरोडेखोर म्हटल्याने गदारोळ --तालुकाध्यक्ष यांची दिलगीरी ..

  कारखान्याची वार्षिक सभेत भाजपाचे कार्यकर्ते भाऊसाहेब अभाळे यांचे मनोगत सुरु असताना खाली बसलेल्यातुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माधवराव तिटमे यांनी विरोध करताना देशाचे सहकारमंत्री ना.अमित शहा यांना दरोडेखोर संबोधलेने भाजपाचे कार्यकर्ते व शिवसेना ठाकरे गट कार्यकर्तेत बाचाबाची सुरु झाल्याने सभेत गदारोळ सुरु झाला नंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष व ज्येष्संठचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकला.


मागील प्रोसेंडिंगमध्ये त्यावेळी कारखाना भ्रष्टाचार केलेल्या अधिका-याची चाैकशी करून कारवाई व वसुली करावी हि मागणी केली होती त्यावर कारवाई नाही व प्रोसींडिंग मध्ये उल्लेख नाही.सभा झाल्यावर सगळे विसरून जातात.पारदर्शकपणा वाढवण्यासाठी दिलीप नाईकवाडी सारख्या चांगल्या कामगाराची नियुक्ती करावी अशी सुचना केली 

जेष्ठ नेते दशरथ सावंत म्हणाले कि, आज कर्ज वाढते ज्या दिवशी कर्जातला रूपया कमी करु त्या दिवशी कारखाना वाचण्याचे दिशेने वाटचाल म्हणता येईल. फक्त कारखाना वाचला  पाहिजे म्हणायचे कर्ज वाढवायचे व त्यावर उपाययोजना करायचे नाही.राज्यात कारखाने अडचणीत आले ते अडचणीत का येतात त्याचा शोध कोणी घेत नाही.भ्रष्टाचारामुळे कारखाने आजारी पडले.त्यावेळी राज्य सरकारानी भ्रष्टाचाराला व कारखाने अडचणीत येण्यास प्रेरणा दिली. भ्रष्टाचाराला सरकारने प्रोत्साहन दिल्यानेच कारखाने राजकारण्याची कुरण झालीत असा आरोप केला.

    याप्रसंगी कारखान्याचे वतिने सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नामदेव शेटे यांनी केले तर आभार संचालक प्रदिप हासे यांनी मानले



Post a Comment

Previous Post Next Post