अशोकराव कारभारी उगले यांची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड | महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर !
अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी ऐतिहासिक ठरलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर झाली आहे. दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी अकोले येथे पार पडलेल्या या सभेत सलग चौथ्यांदा तालुका अध्यक्षपदी अशोकराव कारभारी उगले यांची बिनविरोध निवड होऊन त्यांनी पुन्हा एकदा विश्वासाचा झेंडा उंचावला. या निवड प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक मा. संजयजी भोकरे, प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली व उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव डॉ.अनिल रहाणे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली.
निवडीत निवडले गेलेले प्रमुख पदाधिकारी:
या निवड प्रक्रियेत तालुका अध्यक्ष म्हणून अशोकराव कारभारी उगले, कार्याध्यक्षपदी दत्ता जाधव, तर तालुका सचिवपदी हरिभाऊ फापाळे यांची निवड झाली. याशिवाय संघटनेतील विविध पदांसाठी पुढील कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी जगन्नाथ आहेर संपर्कप्रमुख पदी संजय गायकर, हरिभाऊ आवारी, वसंत सोनवणे, ललित मुर्तडक, अशोक शेळके, सहसचिव सचिन लगड यांची निवड करण्यात आली.
इतर पदाधिकारी व विशेष जबाबदाऱ्या संघटनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून अन्य पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली . सरचिटणीस प्रवीण धुमाळ, सह संघटक दत्ता हासे, राजेंद्र मालुंजकर, निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख सचिन खरात, सोशल मीडिया सचिव शुभम फापाळे, संघटक सुरेश देशमुख, प्रसिद्धीप्रमुख दत्तू जाधव, सुनील आरोटे, राजेंद्र राठोड, प्रकल्प प्रमुख निलेश वाकचौरे, राज्य प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर, खजिनदार भागवत खोल्लम, हल्ला विरोधी समिती शंकर संगारे, सोशल मीडिया प्रमुख सुनील शेणकर, सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख ओंकार अस्वले, पठार भाग सोशल मीडिया प्रमुख सतीश फापाळे, रजिस्टर निखिल भांगरे आदींची निवड करण्यात आली.
पत्रकारांसाठी संघाची खंबीर भूमिका – डॉ. विश्वासराव आरोटे.
या सभेत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले की, “पत्रकार कोणत्याही संघटनेचा किंवा दैनिकाचा असला तरी तो समाजासाठी काम करणारा असतो. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नेहमीच पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. कोरोना काळात असो किंवा अपघातग्रस्त पत्रकार कुटुंबांना मदत करण्याचा प्रश्न असो, संघाने वेळोवेळी पुढाकार घेतला. मी स्वतः व्यक्तिगत स्वरूपातही अनेकदा पत्रकारांच्या मदतीसाठी धावून गेलो आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी संघाची भूमिका अधिक बळकट होत आहे.”
पत्रकार बांधवांसाठी विशेष वाटप:
या कार्यक्रमात पत्रकार बांधवांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेच्या सदस्यांना फाईल डॉक्युमेंटरी बॅग, टी-शर्ट, पेन, घड्याळ, छत्री यांसह सदस्यांच्या कुटुंबीयांना कपडे देण्यात आले. हा उपक्रम उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवला.
मान्यवरांची उपस्थिती:
या बैठकीला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे मान्यवर म्हणजे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव डॉ. अनिल रहाणे, प्रा.जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, सुनील आरोटे, सुनील शेंनकर, जगन्नाथ आहेर, दत्तूशेठ जाधव, ललित मुतडक, दिनकर बर्वे, हरिभाऊ आवारी, सचिन लगड, संजय फुलसुंदर, सुरेशराव देशमुख, शंकरराव संगारे, बाजीराव भांगरे, भागवत खोल्लम आदींचा समावेश होता.
संघाविषयी वाढता विश्वास व आशा:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने गेल्या काही वर्षांत पत्रकारांच्या हक्कांसाठी घेतलेल्या ठोस भूमिकांमुळे अकोले तालुक्यात संघाविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा बिनविरोध निवडून आलेले अशोकराव उगले हे त्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. या नव्या कार्यकारिणीमुळे तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या अधिक गांभीर्याने सोडवल्या जातील, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जातील आणि पत्रकारितेच्या कार्याला नवा आयाम मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव डॉ. अनिल रहाणे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्तविक जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर आभार सचिव हरिभाऊ फापाळे यांनी मानले