आनंदगड पॉलीटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी घेतली अगस्ति कारखान्याची व एस टी वर्कशॉप ची माहिती




आनंदगड पॉलीटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी घेतली अगस्ति कारखान्याची व एस टी वर्कशॉप ची माहिती

 आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेजचा इंडस्ट्रीयल व्हिजिट चा स्तुत्य उपक्रम- परबतराव नाईकवाडी

साखर कारखाना सर्व इंजिनिअरिंगच्या विद्येचे माहेर घर- चिफ इंजिनिअर दिलीप नाईकवाडी

अकोले प्रतिनिधी- 

 इंडस्ट्रीयल व्हिजिट चा उपक्रम राबविणारे आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज हे अव्वल ठरले असून त्यांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा व त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढविणारा स्तुत्य असल्याचे प्रतिपादन अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक परबतराव नाईकवाडी यांनी केले.



 आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट संचलित आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज,विरगाव च्या सर्व ब्रँच च्या विद्यार्थ्यांनी अगस्ति सहकारी साखर कारखाना अकोले व एसटी वर्कशॉप येथे  सर्व मशिनरी,त्यांची कार्यपद्धती, सुरक्षतेतेचे नियम, वेळेचे महत्व, पुढील भविष्यासाठीचे सर्व संकल्पना स्पष्ट होण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या इंडस्ट्रीयल व्हिजिट प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री नाईकवाडी बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी संचालक संदीपराव शेटे होते.यावेळी प्रभारी  कार्यकारी संचालक विजयराव सावंत,चिफ इंजिनिअर दिलीपराव नाईकवाडी,केमिस्ट विभागाचे प्रमुख एस आर सहाणे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर संजय आरोटे, आनंदगड पॉलिटेक्निक चे समन्वयक विद्याचंद्र सातपुते, प्रा.आकाश डोखे,प्रा.उमेश पटेकर,प्रा.पूजा शेळके,प्रा.अनिता पथवे, सुरक्षा रक्षक अधिकारी संजय गिते, आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.



 संचालक परबतराव नाईकवाडी पुढे म्हणाले की,आपण नविन तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश घेतला त्याबद्दल आपले अभिनंदन करतो,आपले ध्येय गाठण्यासाठी आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज विविध उपक्रम राबवित आहे हे कौतूकास्पद आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपल्या क्षेत्रात पारंगत व्हावे,सर्व कौशल्य प्राप्त करावीत.आपले ध्येय गाठण्यासाठी जिद्द बाळगून परिश्रम, मेहनत करावी असे मत व्यक्त करून यशस्वी होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.



 कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपराव शेटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी चिफ इंजिनिअर दिलीपराव नाईकवाडी यांनी  साखर कारखाना हा सर्व इंजिनिअरिंगच्या विद्येचे माहेर घर असून ठिकाणी सर्व इंजिनिअरिंग च्या शाखांचे कार्य चालते.या सर्व विभागांची  माहिती घेतल्यास आपल्याला डिप्लोमा करतांना कोणतीच अडचण येणार नाही असे सांगितले. 


यावेळी त्यांनी इंजिनिअरिंग विभागात कसे कार्य चालते याची तपशीलवार माहिती दिली.तर केमिस्ट विभागाचे प्रमुख एस आर सहाणे यांनी साखर निर्मिती होतानाची सर्व प्रक्रिया समजावून सांगितली.तर  इलेक्ट्रिकल इंजिनिअर संजय आरोटे आणि बॉयलर इंजिनिअर सागर घोडके यांनी विद्यार्थ्यांना सर्व विभाग दाखवून माहिती दिली.



यावेळी प्रास्ताविक समन्वयक प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर आभार प्रा.आकाश डोखे यांनी मानले. अगस्ति साखर कारखाना पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी एस टी वर्कशॉप ला भेट देऊन वर्कशॉप ची सर्व माहिती घेतली.यावेळी आगार प्रमुख सुरेश धराडे,सचिन वाकचौरे,वर्कशॉप चे अर्जुन गावंडे आणि वशीम  शेख यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post