अमृतसागर दूध संघाकडून 13 कोटी 02 लाख 21 हजार रु दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व कामगार,व्यापारी यांच्या खात्यात बँकेत वर्ग - चेअरमन वैभवराव पिचड
अकोले प्रतिनिधी-
अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक आणि प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षभरात पुरविलेल्या चांगल्या गुणप्रतिच्या दुधावर संघामार्फत दूध उत्पादकांना दीपावली निमित्त दुधभाव फरक पंधरवाडा दूध पेमेंट, कर्मचारी बोनस ,ठेकेदार पेमेंट व इतर व्यापारी देणी पोटी एकूण सुमारे 13 कोटी 02 लाख 21 हजार 682 रुपये दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या व व्यापारी यांच्या खात्यावर बँकेत वर्ग केले असल्याची माहिती अमृतसागर दूध संघाचे चेअरमन मा.आ.वैभवराव पिचड यांनी दिली.
याबाबत त्यांनी सांगितले की, दि.30 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अधिमंडळाच्या बैठकीत दूध भाव फरक देऊन उत्पादकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय चेअरमन मा.आ.वैभवराव पिचड व संचालक मंडळानी घेतला होता. त्यानुसार दि.11 ऑक्टोंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
त्यानुसार अमृतसागर दूध संघाने उत्पादक व कर्मचाऱ्याचे खात्यावर बँकेत 13 कोटी 02 लाख 21 हजार 682 रुपये वर्ग करण्यात आले . यामध्ये दूध भाव फरक 1 रु.30 पैसे प्रमाणे 4 कोटी 51 लाख 29 हजार 673 ,पंधरवाडा दूध पेमेंट 5 कोटी 46 लाख 61 हजार 289 ,अनामत 2 कोटी 30 हजार 969 अनामत परतावा 5% नी 10 लाख 1 हजार 548 ,कर्मचारी बोनस् व पगार 55 लाख 13 हजार 215 रु व इतर देणी अशी एकूण 13 कोटी 02 लाख 21 हजार 682 रुपये दूध उत्पादक व कर्मचारीचे खात्यात बँकेत वर्ग करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे दीपावली निमित्त तालुक्यातील दूध उत्पादक व कामगारांना बोनस , वेतनवाढ आदी रक्कम अदा करण्यात आल्याने दूध उत्पादक,कामगार, व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच यामुळे दीपावलीला अकोलेची बाजारपेठ फुलेल.अमृतसागर दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक सभासदांचे हित जोपासताना दूध उत्पादकांना फायद्याचे ठरतील असेच निर्णय घेतलेले आहे. तालुक्यातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांना किफायतशीर दूध भाव मिळणे कामी अमृतसागर दूध संघास उच्च प्रतीचा जास्तीत जास्त दूध पुरवठा करण्यात यावा असे आवाहन करून सर्व दूध उत्पादकाना केले व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा चेअरमन मा.आ.वैभवराव पिचड यांनी दिल्या. यावेळी व्हा.चेअरमन श्री रावसाहेब वाकचौरे, संचालक श्री गोरक्ष मालुंजकर,श्री आनंदराव वाकचौरे,श्री शरदराव चौधरी,श्री जगन देशमुख,श्री गंगाधर नाईकवाडी, श्री रामदास आंबरे, श्री अरुण गायकर,श्री बाबूराव बेनके,श्री आप्पासाहेब आवारी,श्री सुभाष डोंगरे,श्री शिवाजी गायकर, सौ.अश्विनी धुमाळ,सौ.सुलोचना औटी,श्री दयानंद वैद्य,श्री बाळासाहेब मुंढे,जनरल मॅनेजर श्री दादाभाऊ सावंत यांनीही सर्वांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
