निधन वार्ता - अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील शेतीनिष्ठ शेतकरी कै.दादाभाऊ बाळाजी नवले यांचे निधन झाले.
निधन वार्ता - दादाभाऊ नवले
अकोले प्रतिनिधी- तालुक्यातील नवले वाडी येथील शेतीनिष्ठ शेतकरी
कै.दादाभाऊ बाळाजी नवले( वय वर्षे 90) यांचे वयोमानानुसार बुधवार दि.15 रोजी निधन झाले.
ते अकोले येथे एस.टी. महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,तीन सुना,जावई,नातू असा मोठा परिवार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवा निवृत्त अधिकारी मनोहर नवले आणि बुवासाहेब नवले मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचे जनरल मॅनेजर विलास दादा नवले यांचे ते वडील होत.
त्यांच्यावर नवले वाडी येथे स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर,ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दीपावली सणानिमित्त त्यांचा दशक्रिया विधी पाचव्या दिवशी म्हणजे रविवार दि.19 रोजी सकाळी 7.30 वाजता प्रवरा तिरी,पाटील पाणवठा,अकोले येथे होणार आहे.