पाच मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार



 पाच मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार

अकोले प्रतीनिधी- पतीच्या निधनानंतर  पत्नी कै.लीलाबाई  दगडू शिंदे यांनी आपल्या ५ मुलींचा सांभाळ करीत असा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. सर्व मुलींचे शिक्षण पूर्ण करून सधन कुटुंबामध्ये विवाह केले. व स्वतः सर्व शेतीची जबाबदारी घेतली. शेतामध्ये घर असल्यामुळे एकट्याच सर्व सांभाळत होत्या. 


रात्री नदीला जाऊन मोटार चालू करणे असेल अथवा रात्री उसाला पाणी भरणे सर्व काम स्वतः करत. मोठे क्षेत्र बागायती करत असताना शेतातील पीक अतिशय चांगले असत. त्यांचे वयाचे ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. सर्व  पाचही मुली त्यांच्या शेवटच्या काळात त्यांची सेवा करत होत्या.  अंत्यसंस्काराच्या वेळी सर्व मुलींनी निर्णय घेतला की आम्ही स्वतः आमच्या आईला खांदा देणार व अग्निडाग देणार आहे.त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करीत ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी देखील या गोष्टीसाठी सहमती दर्शविली. आणि लहान मुलगी मनीषा हिने पाणी दिले तर संगीता भालेकर, सुनीता लेंडघर, कमल बिरदवडे, ललिता गायकवाड यांनी आईला अग्नीडाग  दिला. अंत्यसंस्काराच्या वेळी सर्व नातेवाईक ,ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post