पिंपळगाव निपाणी येथील जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत संस्थापक स्व.नारायण दादा वाकचौरे व स्व.विश्वनाथ खंडुजी वाकचौरे यांच्या फोटोंचे अनावरण...
अकोले प्रतिनिधी- जगदंबा पतसंस्था, पिंपळगाव निपाणीच्या या संस्थेच्या स्थापनेपासून महत्वपूर्ण योगदान देणारे स्व.नारायण दादा वाकचौरे आणि स्व.विश्वनाथ खंडूजी वाकचौरे यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या फोटोंचे अनावरण करण्यात आले.
यावेळी या फोटो अनावरण प्रसंगी जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन शरद दत्तात्रय वाकचौरे, व्हा. चेअरमन डॉ.अनिल नानासाहेब गोर्डे, संचालक सौ. पुष्पा वाकचौरे, विजय वाकचौरे, भाजप युवा मोर्चा अकोले अध्यक्ष प्रतिक वाकचौरे, मनोहर वाकचौरे, बाबुराव वाकचौरे, भाऊरावशेठ तोरमल , ज्ञानेश्वर नारायण वाकचौरे, बाळासाहेब काकापाटील वाकचौरे, दत्तूशेठ गोर्डे, डि.के.गोर्डे, दादाभाऊ गोर्डे, जालिंदर वामन वाकचौरे, देवराम कारभारी वाकचौरे, राजाराम वाकचौरे, सुभाष वाकचौरे, सुरेश वाकचौरे, विठ्ठल वाकचौरे, अरूण वाकचौरे तसेच संस्थेचे कर्मचारी वृंद नवनाथ गोर्डे, राहुल अनार्थे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगदंबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, पिंपळगाव निपाणी ही संस्था २००१ साली स्थापन झाली.यावेळी स्व.नारायण दादा वाकचौरे आणि स्व.विश्वनाथ खंडूजी वाकचौरे यांचा या संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग होता.संस्थेच्या प्रत्येक कामात ही माणसं अग्रणी असायचे, खऱ्या अर्थाने कुठल्याही पदाची किंवा लाभाची अभिलाषा न धरता या व्यक्तींनी या संस्थेसाठी त्याग केला.
गावातील स्थानिक रहिवासी गोरगरीब, शेतकरी कष्टकरी माणसाला या संस्थेच्या माध्यमातून विश्वासाने आर्थिक व्यवहार करता येतील. या हेतूने या माणसांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना, गावातील आपल्या विश्वासू सहकाऱ्यांच्या मदतीने ही संस्था स्थापन करून, नावारूपाला आणण्यासाठी काम केलं, आणि या माणसांच्या कारकिर्दीत संस्थेचा आलेख उंचावलेला दिसतो.
भविष्यकाळात पुढील पिढ्यांना गावातील संस्थेमध्ये कुठल्याही पदावर काम करत असताना याचा आदर्श घ्यावा व उत्कृष्ट काम करून आपला नावलौकिक टिकवावा या हेतूने व या संकल्पनेतून या दोन्ही स्मृतींचे फोटो आज "जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळगाव निपाणी" या संस्थेत लावले आहे. या बाबत ग्रामस्थांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले.