कालभैरव जयंतीनिमित्त हजारो भाविकांनी रांगेत घेतले दर्शन. दिपोत्सव,रांगोळी आणि फटाक्यांची आतिषबाजी ने वेधले सर्वांचे लक्ष



 कालभैरव जयंतीनिमित्त हजारो भाविकांनी  रांगेत घेतले दर्शन.   दिपोत्सव,रांगोळी आणि फटाक्यांची आतिषबाजी ने वेधले सर्वांचे लक्ष


अकोले प्रतिनिधी - अकोले येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री कालभैरवनाथांची  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी हजारो भाविकांनी सिद्धेश्वराचे आणि  कालभैरवनाथाचे रांगेत दर्शन घेतले.

येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ श्री काळभैरवनाथांचे अतिशय पुरातन मंदिर असून दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.यावेळी हजारो दिव्यांनी संपुर्ण परिसर उजळून गेला होता.तसेच यावेळी दिपोत्सव, मोठी काढलेली  आकर्षक रांगोळी  व फटाक्यांची आतिषबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

  

  येथे गणपती,मारुती, आंबिका देवी,शनी महाराज  श्री कालभैरव नाथांची मुर्ती आहे. यावेळी भाविकांनी श्री कालभैरव नाथ यांना हार,खडीसाखर, उदबत्ती,व बाजरीची भाकरी,लाल लसणाची चटणी,कांद्याची पात टाकून वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखवुन मानसन्मान केला.तसेच सर्वांनी एका तालासुरात 11 वेळा श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण केले.

श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे. आठ दिशांना मुख्य मुख्य आठ आठ क्षेत्र रक्षक भैरव देवता असुन या 8 ×8=64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्रीकालभैरवनाथ हे होय.गावाचे व भाविकांचे सरंक्षण करणारे हे मुख्य कोतवाल दैवत आहे.

                                                        

श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्धजलधारांचा रुद्रभिषेक अतिप्रिय आहे. श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्यनियमित पठणाने विशालकिर्ती प्राप्त होते, काशी क्षेत्री वास करुन पुण्य अर्जित करण्याचे पुण्य लाभ होतो, धर्म नीतीने वागण्याची बुद्धी-धैर्य तथा तशी परिस्थिती प्रतिकूल होते. 

श्री कालभैरावानाथांचा महिमा जे वाचवतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडेल अशी आख्यायिका आहे.  सिद्धेशवर मंदिर हे एक शिल्पकलेचा उत्तम नमुना असून सायंकाळच्या आरती नंतर पणत्या प्रजवलीत करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सर्व पणत्या प्रजवलीत झाल्यावर हे दृश्य पहाण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईल मध्ये हि फोटो  घेतानाची स्पर्धाच जणू इथे पहायला मिळाली. असंख्य दिव्यांनीहा परिसर उजळून निघाला होता. यावेळी बुंदीच्या लाडू चा प्रसादाचे वाटप करण्यात आले. दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेक  भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post