बाल संस्कार शिबिराने उद्याचे संस्कारक्षम व सुसंस्कृत नागरिक घडतील- सपोनि हजारे
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एक दिवसीय बाल संस्कार शिबिर संपन्न
अकोले प्रतिनिधी- श्री स्वामी सेवा केंद्रा मार्फत आयोजित केलेल्या बाल संस्कार शिबिर हा उपक्रम स्तुत्य असून या शिबिरातून उद्याचे चांगले संस्कारक्षम व सु संस्कृत नागरिक घडतील असे प्रतिपादन अकोले पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे यांनी केले.
प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व नितीन दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,पाटील गल्ली, अकोले येथे एक दिवसीय बाल संस्कार शिबिर आयोजित केले होते.त्याचे श्री हजारे यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले.या प्रसंगी श्री हजारे बोलत होते. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी संजय हुजबंद, केंद्र प्रतिनिधी भाऊसाहेब कडलग, सुनील नाना रासने, विलास नवले, मच्छीन्द्र लांडगे सर, सेवा निवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,चंद्रप्रभा देशमुख, सविता कोटकर,रंजना नवले, कल्याणी नाईकवाडी,साक्षी शेणकर आदीसह पालकांसह अनेक लहान मुले- मुली उपस्थित होते.
या शिबिरात स्तोत्र,मंत्र पठण,योगासने ची प्रात्यक्षिक झाली,व्यसनमुक्ती वर कुंभेफळ च्या मुलांनी नाटिका सादर केली.तर शिबिरार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगून मार्गदर्शन करण्यात आले.
श्री हजारे पुढे म्हणाले की,मुलांनी या शिबीराचा लाभ घ्यावा,आई वडिलांचा आदर करावा,त्यांचे म्हणणे ऐकावे, तसेच शिक्षकांनी शिकविले अभ्यास करावा, या शिबीरात जे काही शिकविले जाते,ते लक्षात ठेवावे,बाल संस्कार शिबिर हे पुढील पिढी घडविण्यासाठी उपयुक्त असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे कौतुक केले.स्वागत व प्रास्ताविक संजय हुजबंद यांनी करताना केंद्रामार्फत राबविले जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन सौ.चंद्रप्रभा देशमुख यांनी केले तर आभार सविता कोटकर यांनी मानले.यावेळी सर्व शिबिरार्थीना सुरुची भोजन देण्यात आले.