वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या प्रथम पुण्य सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहाण्यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांचे नम्र आवाहन
स्व.वंदनीय मधुकरराव पिचड साहेब यांना जवळपास एक वर्ष होत असून त्यांचे प्रथम पुण्यस्मरण सोहळा गुरुवार दि.२७/११/२०२५ रोजी राजूर येथे मा.मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.तरी सर्व नागरिकांनी या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित रहावे असे नम्र आवाहन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, यावेळी मुक्ताईनगर (जळगाव) येथील हभप विशाल महाराज खोले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तसेच वंदनीय पिचड साहेब यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने अगस्ति कला,वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम चालु असून त्यांच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.